Bajrang Dal Activists Forced Couple to Get Married on Valentine's Day (Photo Credits: YouTube)

व्हेलेंटाईन डे हा पाश्चात्य संस्कृतीचा आपल्यावरील प्रभाव आहे असे सांगत अनेक उजव्या विचारसरणीची लोकं 'व्हेलेंटाईन डे' (Valentine’s Day) भारतामध्ये साजरा करण्याला विरोध करतात. यामधील एक नाव म्हणजे बजरंग दल (Bajrang Dal) . हैदराबादमध्ये (Hydrabad) व्हेलेंटाईन डेला विरोध करत एका जोडप्याचं जबरदस्ती लग्न लावून त्यांना घरी पाठवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. Valentine’s Day 2019: म्हणून '14 फेब्रुवारी'ला साजरा केला जातो व्हेलेंटाईन डे!

हैदराबादमध्ये आज सर्वजनिक ठिकाणी बजरंग़ दलाचे कार्यकर्ते फिरत आहे. एका पार्कमध्ये बसलेल्या जोडप्यांवर बजरंग दलाच्या कार्यकत्यांची नजर गेली आणि त्यांनी काहीही विचारपूस न करता त्यांचं जबरदस्तीने लग्न लावून दिलं. या प्रकारानंतर नजीकच्या रेस्टॉरंट, पबमध्येही व्हेलेंटाईन डेचं सेलिब्रेशन होऊ नये यासाठी पुरेशी खबरदारी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून घेण्यात आली आहे. यासाठी बाईक रॅली काढण्यात आली आहे.

सोशल मीडियावर या प्रकाराची चर्चा आणि फोटो व्हायरल झाल्यानंतर Medchal police

यांच्याकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे.