Valentine’s Day 2019: म्हणून '14 फेब्रुवारी'ला साजरा केला जातो व्हेलेंटाईन डे!
Valentine’s Day 2019 (Photo Credits: Pexels)

Valentine’s Day 2019: 14 फेब्रुवारी हा दिवस प्रेम दिवस म्हणजे 'व्हेलेंटाईन डे' (Valentines Day) म्हणून साजरा केला जातो. प्रेमी युगुल हा प्रेमाचा दिवस अगदी दणक्यात सेलिब्रेट करतात. सगळीकडे उत्साहाचे, आनंदाचे वातावरण असते. गिफ्ट्स, शॉपिंग अशा विविध ढंगात व्हेलेंटाईन डे सेलिब्रेट केला जातो. हा एकच दिवस नाही तर 'रोझ डे' ते 'व्हेलेंटाईन डे' असे व्हेलेंटाईन वीकचे आठवडाभर सेलिब्रेशन असते. पण 14 फेब्रुवारीलाच हा दिवस का बरं साजरा केला जातो? जाणून घेऊया...

तिसऱ्या शतकात रोम देशात एक क्रुर सम्राट होता. जो प्रेम करणाऱ्या युगुलांवर अत्याचार करत असे. मात्र त्याच्या अत्याचारा न जुमानता व्हेलेंटाईन नावाच्या एका संताने प्रेमाचा संदेश दिला. त्याच्या या कृत्यानिमित्त व्हेलेंटाईनला जेलमध्ये टाकण्यात आले आणि 14 फेब्रुवारी 270 साली त्याला फासावर लटकवण्यात आले. संत व्हेलेंटाईन यांनी प्रेमासाठी दिलेल्या या बलिदानाची आठवण म्हणून प्रत्येक वर्षी 14 फेब्रुवारीला 'व्हेलेंटाईन डे' साजरा केला जातो. Happy Valentine’s Day शुभेच्छा देण्यासाठी खास Romantic Quotes, Greetings, GIF Images,WhatsApp Messages,SMS; प्रेमाचा दिवस आज नक्की खास बनवा!

सुरुवातीला नाक मुरडरत पाहणाऱ्या या संस्कृतीचा स्वीकार आता अगदी सहज व्हायला लागला आहे. आजचा दिवस विशेषत: तरुणाईसाठी आणि प्रेमी युगुलांसाठी खास असतो. अव्यक्त प्रेमाची भावना व्यक्त करण्याचा हा दिवस. तुमच्या मनातील प्रेमाची भावना प्रिय व्यक्तीसमोर व्यक्त करायची असल्यास आजची संधी अजिबात दवडू नका.