Happy Valentine’s Day शुभेच्छा देण्यासाठी खास Romantic Quotes, Greetings, GIF Images,WhatsApp Messages,SMS; प्रेमाचा दिवस आज नक्की खास बनवा!
व्हेलेंटाईन डेचं औचित्य साधून तुम्ही तुमच्या मनातल्या भावना बोलून दाखवणार असाल तर ही काही रोमॅन्टिक ग्रिटिंग्स, मेसेजेस,GIF Images आणि व्हॉट्सअॅप, फेसबूक स्टेटस नक्की शेअर करा
Valentine’s Day 2019 Wishes: 14 फेब्रुवारी हा दिवस जगभरात 'वेलेंटाईन डे' (Valentines Day) म्हणून साजरा केला जातो. फेब्रुवारी महिन्याचा दुसरा आठवडा तरूणाईसाठी आणि प्रेमी युगुलांसाठी खास असतो. यादिवशी तुमच्या प्रिय व्यक्तीजवळ प्रेमची कबुली दिली जाते, नात्यामधील विश्वास, आदर खास या दिवशी विविध माध्यमातून व्यक्त केला जातो. मग हे नातं केवळ प्रियकर आणि प्रेयसी यांच्यापुरता मर्यादीत नसतं. प्रेमाचा केवळ एकच दिवस का असावा? यावर अनेक मतमतांतर आहेत. पण आयुष्य कधीच केवळ लव्ही-डव्ही नसतं, त्यामध्ये चढ-उतार, रूसवे फुगवे असतात. 364 दिवस तुम्ही प्रेम करत असलात तरीही एक दिवस त्या प्रेमाची कबुली देणंही गरजेचे आहे. मग यंदा वेलेंटाईन डेचं औचित्य साधून तुम्ही तुमच्या मनातल्या भावना बोलून दाखवणार असाल तर ही काही रोमॅन्टिक ग्रिटिंग्स (Romantic Greetings), मेसेजेस (Messages),GIF Images आणि व्हॉट्सअॅप (WhatsApp Status), फेसबूक स्टेटस (Facebook Status) शेअर करुन पहा तुमच्या प्रेमाला समोरच्य व्यक्तीकडून प्रतिसाद मिळतोय का? Valentine's Day 2019: 'वेलेंटाईन डे'च्या दिवशी 'स्मार्ट' पद्धतीने गिफ्ट खरेदी करा, किंमत फक्त 1000 रुपयांपेक्षा कमी
Valentine’s Day 2019 रोमॅन्टिक ग्रिटिंग्स, मेसेजेस
पाहशील जिथे जिथे नजर उचलून…
मीच असेल उभा ओठांवर स्मित घेऊन आलेत कधी जर तुझ्या डोळ्यात दुखांचे अश्रू….
तुला सुखाचे आनंदाश्रू तिथे तिथे देऊन…….!!!
Happy Valentine’s Day!

डोळ्यातल्या स्वप्नाला...
कधी प्रत्यक्षातही आण !
किती प्रेम करतो तुझ्यावर,
हे न सांगताही जाण !!!
Happy Valentine's Day!

मनातले शब्द न शब्द तुलाच सांगायचे आहेत भविष्याचे वेध
कवेत तुला घेऊनच घ्यायचे आहेत
रंगवलेली स्वप्ने सत्यात साकारायची आहेत
फक्त मला प्रिये... त्यासाठी, साथ तुझी हवी आहे...
Happy Valentine's Day!

तुझ्या प्रेमाचा रंग तो...
अजूनही बहरत आहे.
शेवटच्या क्षणा पर्यंत....
मी फक्त तुझीच आहे !!!
Happy Valentine's Day!

दाटून आलेल्या संध्याकाळी,
अवचित ऊन पडतं.....
तसंच काहीसं पाऊल न वाजवता,
आपल्या आयुष्यात प्रेम येतं....
Happy Valentine's Day!

Valentine's Day GIF Images
व्हेलेंटाईन डे दिवशी नात्यामध्ये पहिल्यांदा मुलानेच कबुली दिली पाहिजे किंवा प्रपोझ केलं पाहिजे असा काही नियम नाही त्यामुळे मुलींनो ! नंतर पश्चाताप करत बसण्यापेक्षा आजच त्याला विचारून मोकळ्या व्हा.
(The above story first appeared on LatestLY on Feb 14, 2019 09:35 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

