उत्तर प्रदेशात (Utter Pradesh) इफ्तार पार्टीला (Iftar Party) बोलावले नाही म्हणून 3 तीन अल्पवयीन बालकांची रागातून हत्या करण्यात आली आहे. या तीन बालकांचे प्रथम अपहरण करुन त्यांच्यावर गोळ्या झाडल्या गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तसेच हत्या करण्यात आल्यानंतर त्यांचे मृतदेह पाण्याच्या हौदात टाकून आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढला.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, बुलंदशहर पीडित कुटुंबाने इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. तर पार्टी सुरु असताना घरामधील तीन लहान मुले खेळण्यासाठी बाहेर गेले होते. तर खुप वेळ झाला हे तिघेही घरी न आल्याने ते बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली. तर शनिवारी या तिघांचे मृतदेह घरापासून सात किमी अंतरावर एका हौदात आढळून आले. पोलिसांनी तपास केला असता त्यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.(सुरत: शॉपिंग कॉम्प्लेक्सला भीषण आग, 20 जणांचा मृत्यू)
या इफ्तार पार्टीत मामेभाऊ मलिक याला निमंत्रण देण्यात आले नव्हते. यामुळे संतप्त झालेल्या मलिक याने त्याच्या दोन मित्रांसोबत या तिघांची हत्या केल्याचे समोर आले आहे. पोलिसांकडून मलिक याला अटक करण्यात आली असून अन्य आरोपींचा शोध घेतला जात आहे.