सुरत: शॉपिंग कॉम्प्लेक्सला भीषण आग, 20 जणांचा मृत्यू
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-PTI)

गुजरात (Gujrat) मधील सुरत (Surat) या ठिकाणी एका शॉपिंग कॉम्प्लेक्सला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत 20 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

एएनआयने या बद्दल अधिक वृत्त दिले असून आग लागलेल्या इमारतीत उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांनी आणि लोकांनी खाली उड्या टाकत आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. तर काहीजण अडकले असल्याचे सांगण्यात येत आहे. आग लागलेल्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर कोचिंग क्लास असून तेथे अचानक आग लागल्याची घटना घडली.(गुजरात: सुरतमध्ये कोचिंग क्लास इमारतीला भीषण आग; 12 विद्यार्थ्यांचा मृत्यू; 30 जण अडकल्याची भीती)

या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबाला गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी 4 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच आग नेमकी कशामुळे लागली याबद्दल अधिक चौकशी केली जात आहे.