गुजरात (Gujarat) मधील सुरत (Surat) येथे सरथाणा परिसरात असलेल्या तक्षशीला इमारतीला शुक्रवारी संध्याकाळी भीषण आग लागली आहे. या आगीमुळे इमारतीत तब्बल 40 जण अडकले आहेत, तर 12 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी अग्नीशमन दलाच्या 18 गाड्या दाखल झाल्या असून आग विझविण्याचे काम सुरु आहे. तसेच, अग्नीशमन दलाचे जवान आणि पोलीस इमारतीत अडकलेल्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. तक्षशीला ही कमर्शियल इमारत आहे, इथे चालू असलेल्या कोचिंग क्लासमध्ये ही आग लागली. आग इतकी भयानक होती की, काही विद्यार्थ्यांनी घाबरुन इमारतीच्या मजल्यावरुन उड्या मारल्या.
#Gujarat A coaching centre in Surat caught fire. Several students are feared to have been killed in the fire and from the falling off the top floor of the building while trying to save themselves. Shocking footage of the incident @DeccanHerald pic.twitter.com/PZNDHJmWDU
— satish jha. (@satishjha) May 24, 2019
आतापर्यंत या दुर्घटनेत 19 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 15 लोकांना जवळच्या रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघातानंतर ट्विट करून दुःख व्यक्त केले आहे. पंतप्रधानांनी गुजरात सरकार आणि स्थानिक अधिकाऱ्यांना यातील पीडितांना सर्वोतोपरी मदत करण्याचे आदेश दिले आहेत.