तरुणाशी मैत्री केली म्हणून कुटुंबाने केली 20 वर्षीय तरुणीची हत्या, कुटुंबासहित गावच्या सरपंचाला अटक
Image used for Representational Purpose | (Photo Credits: File Photo)

लखनऊ: उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) स्थित संत कबीर नगर (Sant Kabir Nagar)  जिल्ह्यात एका वीस वर्षीय तरुणीने गावातल्या एका तरुणाशी मैत्री केल्याने तिच्या कुटुंबीयांनी ठार मारून टाकल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. या तरुणाशी मैत्री संपवण्यासाठी या मुलीला घरच्यांकडून सांगण्यात येत होते मात्र तिने न ऐकल्याने 11 मे ला या तरुणीच्या आईने तिच्या डोक्यात काठी मारून खुन केला असे प्राथमिक माहितीनुसार समजत आहे, यानंतर कुटुंबियांच्या व गावच्या सरपंचाच्या मदतीने या मृत तरुणीचे शरीर गावाबाहेर पुरण्यात आल्याचे पोलिसांतर्फे सांगण्यात येतेय. प्रसंगाची माहिती मिळताच मुलीच्या संशयित आई, दोन भाऊ व काकांसोबत व गावच्या सरपंचांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

14 मे रोजी शेजारच्या गावातील एका व्यक्तीला शेतातील झुडुपांमध्ये कपड्याचे काही तुकडे अडकलेले दिसले त्यानंतर तपास केल्यावर शेतात तरुणीचा मृतदेह सापडला अशी माहिती पोलिसांना देण्यात आली होती. माहिती मिळताच मृतदेहाच्या फोटो सोबत पोलीस या मुलीच्या गावात पोहचले. गावकऱ्यांनी या मुलीची ओळख सांगत तिने दोन दिवसांपूर्वी विष घेऊन आत्महत्या केल्याचे सांगितले, पण नंतर आलेल्या पोस्टमार्टम अहवालानुसार तिच्या डोक्यावर जड गोष्टीने मारल्यामुळे जखम होऊन मृत्यू झाला असल्याचे सांगितल्याने एकूण घटनेला वेगळे वळण प्राप्त झाले आहे. अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी इंडियन एक्सप्रेसच्या सूत्रांना दिली आहे. धक्कादायक! पुण्यात पतीकडून बायको, मुलीची निघृण हत्या

संपूर्ण घटनेबाबत विस्तरित चौकशी केल्यावर ही तरुणी गावातल्या एका मुलाबरोबर काही दिवसांआधी फिरताना गावकर्यांनी बघितले होते त्यानंतर कुटुंबीयांनी तिला मैत्री संपवण्याचा सल्ला दिला मात्र त्याकडे दुर्लक्ष करून ती 11 मे ला पुन्हा त्या तरुणाशी फोन वर बोलत होती यामुळे संतापलेल्या आईने मुलीच्या डोक्यात काठी मारली व ज्यामुळे ती बेशुद्ध झाली होती. काही वेळाने शुद्ध आल्यावर ही तरुणी सतत उलटी करत होती, त्याच दिवशी रात्री तिचा मृत्यू झाला. यानंतर तरुणीच्या कुटुंबीयांनी सरपंचांकडे धाव घेऊन मुलगी विष घेऊन सतत उलट्या करत होती आणि म्ह्णून तिचा मृत्यू झाला असे सांगितले. रात्री उशिरा सरपंच, मुलीचा काका आणि दोन भावांनी मिळून मोटारसायकल वरून मृतदेह गावाशेजारील शेतात पुरला होता. माता ना तू वैरीण! बारामतीत संतापलेल्या आईने पोटच्या मुलीला दगडाने ठेचून केले ठार

या संदर्भात तपास सुरु असून सध्या मुलीच्या कुटुंबासह सरपंचांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे.