
Pune: पुण्यात पतीकडून बायको आणि अडीच वर्षाच्या मुलीची निघृण हत्या करण्यात आल्याने खळबळजनक वातावरण झाले आहे. तर घरगुती वादातून नवऱ्याने बायको आणि मुलीला धारधार शस्राने भोकसल्याचे सत्य उघडकीस आले आहे. या प्रकरणी आरोपी नवऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे.
ताडीवाला रोड येथे मंगळवारी(22 जानेवारी) सकाळी 5 वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. अयाज शेख असे आरोपीचे नाव आहे. बायको तबस्सुम शेख आणि मुलगी अलिना शेख असे त्याच्या घरातील मंडळींची नावे आहेत. अयाज आणि तबस्सुम यांच्यामध्ये घटस्फोटावरुन न्यायलयात केस सुरु आहे. तसेच अयाज आणि तबस्सुम हे दोघे वेगवेगळे राहतात. घरातील वादामुळे संतापलेल्या अयाज याने पत्नीच्या माहेरी जाऊन पहाटे पाच वाजताच्या सुमारास झोपेतच तिच्यावर आणि मुलीवर वार केले. या प्रकरणी दोघींचा मृत्यू झाला आहे.
अयाज याने हत्या केल्यावर घराच्या 'भिंतीवर मै किसको नही छोडूंगा, निकल जाओ मेरे घरसे' असा संदेश ही भिंतीवर लिहीला आहे. या प्रकरणानंतर अयाज याने स्वत:वर ही वार करुन घेतले आहे. सध्या अयाज याची प्रकृती गंभीर असून पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर पोलिसांकडून या घटनेबद्दल अधिक तपास करत आहेत.