SP Ajay Pal Sharma Shoots A Rape Accused (Photo Credits: Twitter, Facebook)

उत्तर प्रदेशातील  (Uttar Pradesh) रामपूर (Rampur)  येथे मागील महिन्यात एका सहा वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. शनिवारी रात्री या घटनेतील फरार आरोपीला पकडताना पोलीस अधीक्षक व आरोपी यांमध्ये चकमक झाली. या मध्ये रामपूरचे पोलीस अधीक्षक आणि एनकाऊंटर स्पेशलिस्ट अजय पाल शर्मा (SP Ajay Pal Sharma)   यांनी आरोपीच्या दोन्ही पायांवर गोळ्या झाडून त्याला आपल्या ताब्यात घेतले आहे. नाजील असे या नराधमाच्या नाव असून 6  मे रोजी त्याने रामपूर मधून या चिमुकलीचे अपहरण केल्याची तक्रार होती. या घटनेनंतर तो तब्बल दिड महिना फरार होता. मात्र अजय यांच्या धाडसामुळे अखेरीस उत्तर प्रदेश पोलिसांना त्याला अटक करण्यात यश आले आहे. बलात्काराच्या आरोपात दोषी आढळल्यास आरोपीला बनवले जाणार नपुसंक; या राज्याने घेतला मोठा निर्णय

काय होतं नेमकं प्रकरण?

रामपूर मधील एका सहा वर्षाच्या मुलीचं 6 मे रोजी अपहरण झालं होतं .अपहरणकर्त्या नराधमाने नंतर त्या मुलीची निर्घृण हत्या करून पलायन केले होते. या प्रकरणात सिव्हील लाइन पोलीस मागील दीड महिन्यापासून नाजिलच्या शोधात होते. दरम्यान या मुलीचा मृतदेह सापडल्याने मुलीच्या कुटुंबियांकडून पोलिसांच्या कामावर प्रश्न केले जात होते. या दबावामुळे आरोपी नाजिलला शोधण्यासाठी पोलिसांनी काही गट तयार केले होते. अखेरीस शनिवारी या शोधमोहिमेला यश मिळाले. उत्तर प्रदेश: बंदुकीचा धाक दाखवत दोन अल्पवयीन बहिणींवर केला सामूहिक बलात्कार

अजय पाल शर्मा यांच्याकडे ‘सिव्हील लाइन पोलीस' स्थानकांत 7 मे रोजी 6 वर्षाच्या मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती, याप्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला होता.तपासादरम्यान मिळालेल्या काही पुराव्यांच्या आधारे काही दिवसांनी मुलीचा मृतदेह सापडला. त्यानंतर आरोपीचा पाठपुरावा करत त्याला त्याचा अटक करण्यासाठी गेले असता पोलीस आणि आरोपीमध्ये चकमक झाली. यावेळी पोलिसांनी आरोपीच्या दोन्ही पायांवर गोळ्या मारल्या आणि त्याला अटक केली अशी माहिती अजय यांनी माध्यमांना दिली आहे.

दरम्यान अजय यांच्या तत्परता व हुशारीमुळे या प्रकरणाचा शोध लागल्याचे म्हंटले जात आहे. यासाठी सोशल मीडियावरून सुद्धा अजय यांच भरपूर कौतुक होत आहे त्यांच्यामुळे मृत मुलीच्या कुटुंबियांना न्याय मिळाला असे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.