उत्तर प्रदेश: बंदुकीचा धाक दाखवत दोन अल्पवयीन बहिणींवर केला सामूहिक बलात्कार
Gangrape. (Image used for representational purpose)

उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) येथे दोन अल्पवयीन बहिणींवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी दोन बहिणींना बंदुकीचा धाक दाखवत नराधामांनी हे क्रुर कृत्य केले आहे. तर आरोपींचा शोध पोलिसांकडून घेतला जात असल्याचे सांगितले जात आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित बहिणी 13 आणि 15 वर्षाच्या आहेत. या दोघी बहिणी आईला शोधण्यासाठी उसाच्या शेतात गेल्या होत्या. त्यावेळी चार व्यक्तींनी ही संधी साधून त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. तसेच बलात्कार केल्यानंतर या प्रकरणी कोणाला सांगितल्यास किंवा कोणाकडे मदत मागितल्यास गोळ्या घालून ठार करु अशी धमकी सुद्धा देण्यात आली.

(Kathua Rape-Murder Case: कठुआ बलात्कार-हत्या प्रकरणी 6 आरोपी दोषी, 3 जणांना जन्मठेप तर 3 जणांना पाच वर्षांची शिक्षा)

या प्रकरणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घडलेला प्रकाराचा तपास लवकरात लवकर करण्यास सांगितले आहे. तसेच अशा प्रकारामुळे गेल्या काही दिवसांपासून बलात्काराच्या घटनेत वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे.