
पंजाब (Punjab) पाठणकोट (Pathankot) मधील विशेष न्यायालयाने आज कठुआ बलात्कार-हत्या प्रकरणी आज निकाल जाहीर केला. तर या प्रकरणी सहा जणांना दोषी ठरण्यात आले असून या प्रकरणातील मास्टरमाइंड सांजी राम याला सुद्धा दोषी ठरण्यात आले आहे. त्याचसोबत दीपक खजुरिया, प्रवेश, तिलक राज, सुरेंद्र आणि आनंद दत्ता यांना दोषी ठरवले आहे. तर विशाल नावाच्या आरोपीची सूटका करण्यात आली आहे. एका वर्षापूर्वी याच कोर्टात कठुआ बलात्कार-हत्या प्रकरणी खटला सुरु करण्यात आला होता. तर बंद खोलीत या प्रकरणाची सुनावणी 3 जून रोजी पार पडली होती.
या धक्कादायक घटनेने सर्व देशात संताप व्यक्त केला जात होता. पंधरा पानी सादर केलेल्या आरोपपत्रात गेल्या 10 जानेवारी रोजी आठ वर्षाच्या मुलीचे अपहरण करुन तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. त्यानंतर चार दिवस तिला बेशुद्ध ठेवून हत्या करण्यात आली होती.
(Kautha Rape Case Verdict: कठुआ बलात्कार प्रकरणाचा निकाल जाहीर, 7 पैकी 6 जण दोषी)
6 आरोपींना मिळाली पुढील शिक्षा:
-ग्राम प्रमुख सांजी राम (मुख्य आरोपी)- जन्मठेप
-स्पेशल पोलीस ऑफिसर दीपक खजुरिया- जन्मठेप
-रसाना गाव परवेश दोषी- जन्मठेप
-असिस्टंट सब इंन्सस्पेक्टर तिलक राज- 5 वर्षांची शिक्षा
-असिस्टंट सब इंन्सस्पेक्टर आनंद दत्ता- 5 वर्षांची शिक्षा
-पोलीस ऑफिसर सुरेंद्र कुमार- 5 वर्षांची शिक्षा
सुप्रीम कोर्टाने जम्मू-काश्मीरच्या बाहेर या खटल्याची सुनावणी करण्यात यावी असे सांगितले होते. तर जम्मूपासून जवळजवळ 100 किमी आणि कठुआपासून 30 किमी दूर पाठणकोट येथील न्यायालयात हा खटला दाखल करण्यात आला.