बलात्काराच्या आरोपात दोषी आढळल्यास आरोपीला बनवले जाणार नपुसंक; या राज्याने घेतला मोठा निर्णय
Image Used for Representational Image Only | (Photo Credits: Latestly/Illustration)

भारतामध्ये घडणाऱ्या बलात्काराच्या (Rape) घटना अक्षरशः सुन्न करणाऱ्या आहेत. आजकाल लहान चिमुरड्यांपासून मोठ्या स्त्रियांपर्यंत कोणीही सुरक्षित नाही अशीच भावना निर्माण होते. साधारण हीच स्थिती इतरही देशांमध्ये आहे. बलात्कारासारख्या घटनांना आळा बसावा म्हणून अमेरिकेतील अलबामा (Alabama) राज्याने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. आता अलबामा राज्यात 13 वर्षाखालील अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्यास आरोपीस चक्क नपुंसकतेचे (Imputent) इंजेक्शन देण्यात येणार आहे.

अलबामा सरकारने घेतलेल्या या निर्णयानुसार, 3 वर्षाखालील अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली दोषी आढळल्यास, आरोपी पॅरोलवर असताना पुन्हा तशाप्रकारचा गुन्हा करू नये म्हणून त्याला  केमिकलयुक्त इंजेक्शन देण्यात येईल. या इंजेक्शनमुळे त्याला नपुंसकत्व येऊन त्याला पुन्हा बलात्कार करण्याची इच्छा निर्माण होणार नाही. कस्टडीतून मुक्त करण्यापूर्वी अथवा पॅरोलमधून सोडन्याच्या एक महिना आधी या व्यक्तिला रासायनिक औषधाचे इंजेक्शन घेण्यात येईल. हे औषध आरोपीच्या शरीरात टेस्टोस्टेरॉन निर्माण करणार नाही.

सोमवारी अलबामाचे राज्यपाल यांनी 'केमिकल कॅस्ट्रेशन' (Chemical Castration) विधेयकाला मंजुरी दिली. कठोर अपराधांची शिक्षाही कठोर असायला हवी, त्यातूनच अपराधांच्या मनात भीती निर्माण होईल असे त्यांनी सांगितले. दरम्यान, इंडोनेशिया आणि साउथ कोरिया मध्येही मुलांच्या लैंगिक शोषण प्रकरणात दोषी आढळलेल्या व्यक्तीला नपुंसक बनविले जाते. दक्षिण कोरिया मध्ये 2011 साली आणि इंडोनेशिया मध्ये 2016 साली असा कायदा लागू करण्यात आला. मात्र अमेरिकेतील इतर देशांनी अलबामाच्या या निर्णयाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. तसेच अनेक समूहांनी या निर्णयाचा पुन्हा एकदा विचार करावा अशी अपील केली आहे.