जीडीपी (GDP) वाढ, अच्छे दिन, प्रगती, विकास आणि आधुनिकतेच्या गप्पा मारणाऱ्या भारतात आजही भूक जगण्यावर भारी ठरताना दिसत आहे. गरीबी इतकी की स्वत:चे पोट भरणे तर सोडाच. पण, स्वत:च्या उदरातून जन्म दिलेल्या पोटच्या मुलांची भूक भागवण्याइतकेही दूध घेण्यास पैसे नाहीत. भूकेमुळे बाळ कळवळून रडतेय. अशा स्थितीत वैतागलेल्या एका आईने आपल्या मुलीची गळा दाबून हत्या केली. उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्यातील कन्नौज (Kannauj) जिल्ह्यात छबरामऊ (Chhibramau) परिसरात ही घटना घडली. धक्कादायक असे की, ही चिमुकली केवळ आठ महिन्यांची होती. पोलिसांनी आरोपी महिलेस अटक केली आहे.
भास्कर डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार, उत्तर प्रदेश राज्यातील छबरामऊ परिसरात राहणारा शाहिद उर्फ शालू हा अत्यंत गरीबीत आयुष्य जगतो. त्याची आर्थिक स्थिती प्रचंड हालाकीची आहे. त्यामुळे तो नोकरीच्या शोधात मुंबईला गेला आहे. पाठीमागे त्याची पत्नी रुखसार आपल्या साध्या घरात तीन मुलांसोबत राहते. शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार रुखसार हिचा आठ महिन्याी मुलगी गेले 3 दिवस उपाशी होता. रुखसार ही आपल्या मुलासाठी दुधाची व्यवस्था करु शकली नव्हती. तिची तिन्ही मुलं उपाशी होती. ती सतत तिच्याकडे खायला मागत होती. ती आपल्या मुलांसाठी काहीच करु शकत नव्हती.
रुखसार हीचा आठ महिन्यांचा मुलगा अहद दूधासाठी गळा फाडून रडत होता. संपूर्ण रात्र ती त्याला पाणी पाजायचा प्रयत्न करत होती. बाळाला दूध मिळतच नव्हते. बाळाची व्याकूळता ती सहन करु शकली नाही. तीने बाळाची गळा दाबून हत्या केली. तीने बाळाची भूक तिच्या परीने संपविण्याचा प्रयत्न केला. (हेही वाचा, भूक लागली तर कपडे खा! किम जोंग-उन याने लॉन्च केले फॅशन प्रॉडॉक्ट)
भास्कर डॉट कॉमने आपल्या वृत्तात म्हटले आहे की, रुखसार ही आगोदरच कोणाकडून तरी 100 रुपये उधार घेऊन आली होती. परंतू, तेवढ्या पैशांमध्ये ती आपली आणि बाळाची भूक भागवू शकली नाही. शुक्रवारी पहाटे बाळाची हत्या केल्यानंतर ती अत्यंत शांत आणि विमनस्क अवस्थेत बसून होती. बराच काळ तिच्या घरात हालचाल जाणवली नाही. त्यामुळे शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी तिच्या घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. पण, तीने अत्यंत रागाने आणि त्वेशाने शेजाऱ्यांना विरोध केला. (हेही वाचा, रांची: नातवाला दुध मिळावे म्हणून 80 वर्षीय आजीने विकली जमिन)
दरम्यान, रुखसार हिच्या दुसऱ्या एका मुलाने दिलेल्या अस्पष्ट माहितीवरुन शेजाऱ्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी रुखसार हिला अटक केली. पोलिसांकडे तिने गुन्ह्याची कबूली दिली. मात्र, तिने गुन्हा का केला या प्रश्नाचे उत्तर ऐकून पोलीसही हादरुन गेले. आपण आणि आपली मुलं गेली तीन दिवस उपाशी होतो. इतरांकडून शंभर रुपये उसने घेतले होते. परंतू, त्यात कोणाचीच भूक भागली नाही. गेले तीन दिवस बाळाने आणि आम्ही कोणीच काही खल्ले नव्हते. मी त्याची कळवळ पाहू शकत नव्हती, असे रुखसार हिने म्हटले आहे.