रांची (Rnchi) येथील एका 80 वर्षीय आजीने आपल्या नातवाला दुध मिळावे म्हणून चक्क जमिन विकली आहे. तर या मुलाची प्रकृतीची देखभाल करण्याची जबाबदारी आजीवर आहे. नातवाच्या काळजीपोटी तिने ही जमिन विकली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
नवजात मुलाची आई आणि वडिल या दोघांचे सुद्धा निधन झाल्याने त्याचा सांभाळ आजी करत आहे. परंतु नातू कुपोषित असून त्याचे उत्तम पालनपोषण व्हावे म्हणून तिने जमिन विकली आहे. मात्र वय झाल्याने नातवाला पुढे कोण पाहणार याची चिंता आजींना सतावत आहे.
तर काही महिन्यांपूर्वी कलारा कुल्लु यांनी आपला मुलगा गमावला. त्यानंतर नातवाला जन्म देताना सुनेचा देखील मृत्यू झाला. परंतु नातवाची देखभाल करण्यासाठी त्या तत्पर असल्याचे दिसून येत आहे.