अंधश्रद्धेचा कहर! परिवारासमवेत नग्न होऊन शिक्षक देत होता तीन वर्षाच्या मुलीचा बळी, वाचा नेमकं घडलं काय?
Nude Teacher with Family (Photo Credits: Twitter/@AfsorHussainLas)

आसाम: अंधश्रद्धा, तांत्रिक मांत्रिक यांच्या आहारी जाऊन लोक काही करू शकतात याची सार्थ पटवून देणारा एक धक्कादायक प्रसंग अलीकडेच उदलगुडी (Udalguri) जिल्ह्यात पाहायला मिळाला. एका तांत्रिकाच्या सांगण्यावरून स्थानिक विज्ञान शिक्षक जदाब सहारिया (Jadab Sahariya) परिवारासमवेत नग्न होऊन रस्त्यावर उतरला होता. या शिक्षकाने आपल्या कुटुंबातील चार जणांसोबत रस्त्यावरच आधी कसलीशी पूजा केली आणि मग आपल्या नातेवाईकाच्या तीन वर्षाच्या मुलीचा बळी देण्याची तयारी करू लागला. या प्रकाराबद्दल आजूबाजूच्या लोकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली, त्यानुसार पोलिसांनी सुद्धा तात्काळ घटनास्थळी धाव घेतली, मात्रत्यांना पाहताच शिक्षक व त्याच्या कुटुंबाने सर्वांवर धारदार हत्याराने वार करायला सुरुवात केली.

प्राप्त माहितीनुसार, परिस्थितीवर नियंत्रण आण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळी गोळीबार करायला केला होता , ज्यात शिक्षक आणि त्याचा मुलगा जखमी झाले त्यानंतर त्यांना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले असता मुलाचा मृत्यू झाला. स्थानिकांच्या माहितीनुसार सहारिया कुटुंबाने सर्वात आधी आपल्या राहत्या घराला आग लावली त्यानंतर महिलांसह चार जणांनी अंगावरील सर्व कपडे काढून रस्त्यावर धिंगाणा घातला आणि मग या निष्पाप मुलीचा बळी देण्याचा डाव मांडला होता.धक्कादायक! मुलाचा कर्करोग बरा करून देण्याच्या बहाण्याने मांत्रिकाचा शास्त्रज्ञाच्या पत्नीवर बलात्कार

ANI ट्विट 

दरम्यान पोलिसांच्या तपासानुसार, शिक्षक ज्या मुलीचा बळी देत होता ती मुलगी त्याच्या मेव्हण्याची असून त्याच्या पत्नीने स्वतःहूनच तिला या कृत्यासाठी सहारिया याच्याकडे सोपवले होते. मात्र स्थानिकांच्या हिमंतीमुळे व पोलिसांच्या कार्यतत्परतेमुळे या चिमुकलीचा प्राण वाचला आहे.