Vibhakar Shastri Joins BJP: माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री (Lal Bahadur Shastri) यांचे नातू विभाकर शास्त्री (Vibhakar Shastri) यांनी बुधवारी (14 फेब्रुवारी) काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. विभाकर यांनीही आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ट्विट करून त्यांनी राजीनामा जाहीर केला. विभाकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मी पक्षाच्या प्राधान्य सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांच्या उपस्थितीमध्ये विभाकर शास्त्री यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी भाजपचे अनेक नेते उपस्थित होते. काही महिन्यांवर लोकसभेच्या निवडणुका होत असताना विभाकर शास्त्री यांनी राजीनामा दिला आहे.
भाजपमध्ये प्रवेश करताना विभाकर शास्त्री म्हणाले - 'मला वाटते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मी लाल बहादूर शास्त्री यांच्या 'जय जवान, जय किसान' या संकल्पनेला अधिक बळ देऊन देशाची सेवा करू शकेन.’ ते पुढे म्हणाले, ‘मला पंतप्रधान नरेंद्र मोदी, नड्डा जी, अमित शहा जी, सीएम योगी आदित्यनाथ जी आणि ब्रजेश पाठक यांचे आभार मानायचे आहेत त्यांनी माझ्यासाठी भाजपचे दरवाजे उघडले. मला वाटते की माझे आजोबा लाल बहादूर शास्त्रीजी यांचेही आभार मानायला हवेत. त्यांचे व्हिजन पुढे नेण्याची संधी मला मिलेले. पक्षनेतृत्वाच्या सूचनेनुसार मी काम करेन.’
Lucknow, Uttar Pradesh | Vibhakar Shastri, grandson of former PM Lal Bahadur Shastri, joins BJP in the presence of Uttar Pradesh Deputy CM Brajesh Pathak.
Shastri resigned from Congress today. pic.twitter.com/povEJbwkPy
— ANI (@ANI) February 14, 2024
दरम्यान, काही महिन्यांतच देशात लोकसभा निवडणुका होणार असताना नेत्यांनी पक्ष सोडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यामध्ये इतर पक्ष सोडून भाजपमध्ये सामील होणाऱ्या नेत्यांची संख्या अधिक आहे. सोमवारीच महाराष्ट्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. (हेही वाचा: Farmers Protest: शेतकरी आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरुच; दिल्ली पोलिसांकडून प्रतिबंधात्मक आदेश, सीमेवर प्रचंड वाहतूक कोंडी)
भाजपमध्ये प्रवेश करताना अशोक चव्हाण म्हणाले की, आज आपल्या राजकीय कारकिर्दीची नवी सुरुवात होत आहे. अशोक चव्हाण यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पक्षाचे मुंबई विभाग प्रमुख आशिष शेलार आणि कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्याचप्रमाणे आसाम काँग्रेसचे आमदार कमलाख्या डे पुरकायस्थ यांनी प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.