Uddhav Thackeray | (Photo Credit- Facebook)

शिवसेना (Shiv Sena) आता केवळ महाराष्ट्रच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरही पाऊल टाकताना दिसत आहे. शिवसेनेने उत्तर प्रदेश पंचायत निवडणूक (Shiv Sena in Uttar Pradesh For Panchayat Elections) लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबबत उत्तर प्रदेश शिवसेना पक्ष पदाधिकाऱ्यांनी पक्ष कार्यालयातून तशी घोषणाही केली. पक्षाकडून या निवडणुसांसाठी जिल्हावार संपर्क प्रमुख आणि प्रभारी नियुक्त केले जात आहेत. तसेच सर्व जिल्ह्यांतून इच्छुक उमेदवारांची नावेही मागवली जात आहेत. उत्तर प्रदेशातील पंचायत निवडणुका (Panchayat Elections in Uttar Pradesh) या विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम मानली जाते. त्यामुळे विविध राजकीय पतक्षांकडून इथे जोर लावला जात आहे. दरम्यान, शिवसेना काँग्रेस पक्षासोबत नवडणूक लढवेन अशी चर्चा आहे.

उत्तर प्रदेश पंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेच्या प्रादेशिक नेतृत्वाने रविवारी सरोजनीनगर येथील पक्ष कार्यालयात एक आढावा बैठक घेतली. या बैठकीत शिवसेना सचिव विश्वजीत सिंह यांनी म्हटले की, शिवसेना राज्य प्रमुख अनिल सिंह यांनी पंचायत निवडणुकीबाबत पूर्ण चर्चा केली. पक्षाकढून पंचायत निवडणुकीसाठी जिल्हावार प्रभारी नियुक्त करण्यात येत आहेत. त्यासाठी सर्व जिल्ह्यातून अर्ज मागविण्यात येत आहेत. (हेही वाचा, Mumbai Film City मुंबईतच राहणार, UP मध्ये नवी फिल्म सिटी उभारणार: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ)

दरम्यान, अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष आणि अखिल भारतीय मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (एआयएमआयएम) या पक्षांनी उत्तर प्रदेश पंचायत निवडणुकीत सहभग घेण्याबाबत घोषणा आगोदरच केली आहे. दरम्यान, शिवसेनेच्या उत्तर प्रदेशमधील नेतृत्वाने आगोदरच म्हटले आहे की, पक्षातील सर्वानुमते निवडणूक लढविण्याबाबतचा निर्णय घेतला आहे.