Uthara Murder Case: कोब्राच्या सर्पदंशाने पत्नीचा खून करणार्‍या पतीला दुहेरी जन्मठेप
Snake (Photo Credits: Pixabay)

कोल्लमच्या सत्र न्यायालयाने (Kollam Additional Sessions Court) आज (13 ऑक्टोबर) पत्नीची सर्पदंशाने हत्या केल्याच्या आरोपाखाली पतीला 17 वर्ष शिक्षेसह दुहेरी जन्मठेप  (Double Life Term) ठोठावली आहे. सूरज असं आरोपीचं नाव असून त्याने 25 वर्षीय पत्नीला मारण्यासाठी कोब्रा (Cobra) सापाचा वापर केला आहे. निकालपत्रापनुसार, विविध कलमांखाली दोषी आढळल्याने सूरजला सलग 10 वर्षे आणि 7 वर्षे शिक्षा भोगावी लागेल. त्यानंतर त्याची जन्मठेप सुरू होणार आहे. दरम्यान सूरजला 5 लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

सूरजला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी मागणी करण्यात आली होती मात्र त्याचे तरूण वय आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याने फाशी ऐवजी जन्मठेप सुनावण्यात आली आहे. नक्की वाचा: सासूच्या हत्येसाठी प्रियकराच्या मदतीने विषारी सापाचा वापर; राजस्थान मध्ये सर्पदंशाने खून घडवून आणण्याचा नवा ट्रेंड असल्याचं सर्वोच्च न्यायलयाचं मत.

उत्तराच्या आईने, Manimekhala यांनी टेलिव्हिजन वर कोर्टाची कार्यवाही पाहिली आहे. त्या निकालावर नाखूश आहेत. न्यायव्यवस्थेतील अशाच पळवाटा सूरज सारखे गुन्हेगार निर्माण करत आहेत. त्यांनी उच्च न्यायालयामध्ये दाद मागणार असल्याचं म्हटलं आहे.

उत्तरा ही 25 वर्षीय Differently Abled Woman होती. सर्पदंशाने तिचा मृत्यू झाला. 2 मार्च 2020 दिवशी पहिल्यांदा जेव्हा तिला सर्पदंश झाला तेव्हा ती यामधून बचावली होती. नंतर 7 मे दिवशी पुन्हा तिला सर्पदंश झाला. या दोन घटनांमध्ये 9 आठवड्यांचा फरक होता. जेव्हा घरातच उत्तरा मृतावस्थेत आढळली तेव्हा साप देखील तिथेच दिसला होता. तिच्या कुटुंबाला हा तिचा नैसर्गिक मृत्यू झाला असावा यावर विश्वास नव्हता. यामागे काही षडयंत्र असावं असा त्यांचा विश्वास होता.

पोलिस तपासामध्ये पती सूरज कडून हा प्रकार झाल्याचं समोर आलं. सूरजने पोलिसांकडे कबुली देत त्याने कोल्लममधील परीपल्ली येथील गारुडी सुरेश कुमार यांच्याकडून 10 हजार रुपयांना दोन वेळा साप खरेदी केले होते. असे देखील सांगितले.