उत्तर प्रदेश: पती पत्नीच्या लहानशा भांडणातून पत्नीची आत्महत्या तर पतीने तिला मुखाग्नी देताना चितेवर उडी मारण्याचा केला प्रयत्न
Dead Body | Representational Image (Photo Credits: Pixabay)

उत्तर प्रदेशच्या महोबा जिल्ह्यामध्ये पत्नीच्या जळत्या चितेवर उडी मारून एका युवकाने जीव देण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान उपस्थितांनी प्रसंगावधान ठेवत त्याला दूर केले. जखमी तरूणाला जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या तरूणाच्या पत्नीने पतीवर नाराज होऊन गळफास घेत आत्महत्या केली.

मीडीया रिपोर्ट्सनुसार, ही आत्महत्या उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यातील आहे. ड्योढ़ीपुरा मध्ये राहणार्‍या बृजेश यांची पत्नी गळफास घेतल्याने मृत पावली. या घटनेनंतर बृजेश वैफल्यग्रस्त झाला होता. चार वर्षांपूर्वीच त्यांचं लग्न झालं होतं.

बृजेशच्या कुटुंबाचं असं म्हणणं आहे की आत्महत्येच्या पूर्वी ब्रृजेशच्या पत्नीने त्याच्याकडे 5 हजार रूपये मागितले होते. त्यावरून झालेल्या नाराजी नाट्याने रात्री पत्नीने गळफास घेत आपलं जीवन संपवलं. बृजेशने तिला लटकलेल्या परिस्थितीमध्ये पाहिल्यानंतर तात्काळ हॉस्पिटलमध्ये तिला नेले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेनंतर बृजेशच्या सासरच्या मंडळींनी पती बृजेश आणि त्याच्या कुटुंबाकर हुंडा मागून हत्या केल्याचा आरोप लावला आहे.

पोस्टमार्टम नंतर अंतिम संस्कारासाठी मृतदेहाला जैतपूर कस्बाच्या ड्योढ़ी स्मशानभूमीत आणण्यात आलं. इथे बृजेशने मुखाग्नी देताना चितेवर उडी मारली. लोकांनी त्याला सावरलं पण चितेच्या आगीत तो भाजला गेला. हॉस्पीटलमध्ये उपचार झाले आहेत. हे देखील नक्की वाचा: Pune: विवाहित महिलेचे विवाहबाह्य संबंध असल्याचे समजल्यावर सासरच्यांकडून व्हायचा जाच, त्रासाला कंटाळून तरुणीची आत्महत्या .

बृजेशच्या मते काही छोट्या कारणांवरून त्याच्या पत्नीने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले आहे. आपला मुलगा सूनेच्या आत्महत्येनंतर नैराश्यात गेल्याचं त्याच्या आई-वडिलांचं म्हणणं आहे.