तरुणावर अत्याचार (संग्रहित संपादित प्रतिमा)

उत्तर प्रदेशातील (UP) बदायूंमधून (Budaun) एक अमानवीय घटना समोर आली आहे. या ठिकाणी एका तरुणाला प्रेम करण्याची तालिबानी शिक्षा मिळाली आहे. शेजाऱ्याच्या पत्नीसोबत प्रेमविवाह करणाऱ्या तरुणावर महिलेचा पती (मुख्य आरोपी) आणि गावकऱ्यांकडून अमानुष अत्याचार करण्यात आला. त्याला एका खांबाला बांधून मारहाण करण्यात आली, त्याच्या चेहऱ्याला काळे फासले. त्यानंतर त्याला चपलांचा हार घालून त्याची गावातून धिंड काढण्यात आली. इतकेच नाही तर या तरुणाला लघवी पिण्यास भाग पाडल्याचा आरोप होत आहे. या संपूर्ण घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ही बाब जिल्ह्यातील फैजगंज बेहता भागातील एका गावातली आहे. महत्वाचे म्हणजे याबाबत तक्रार मिळाल्यानंतर केवळ मारहाण आणि धमकावणे या कलमांतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला होता. 4 मे रोजी ही घटना घडली. पुढे सोमवारी या घटनेचा व्हिडिओ इंटरनेट मीडियावर प्रसारित झाल्यानंतर पोलीस याबाबत सारवासारव करताना दिसले. त्यानंतर पीडित तरुणाला पुन्हा फोन करून कलमे वाढवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले, मात्र तरुणाला लघवी प्यायला लावण्याच्या आरोपाला पुष्टी मिळालेली नसल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.

पहा व्हिडिओ-

फैजगंज बेहता पोलीस स्टेशनचे प्रभारी वेदपाल सिंह यांनी सांगितले की, पिडीत तरुणाने दिलेल्या माहितीनुसार, तो आणि आरोपी (महिलेचा पती) फैजगंज बेहता पोलीस स्टेशन हद्दीतील एकाच गावचे रहिवासी आहेत. दोघेही दिल्लीत राहत असताना मजूर म्हणून काम करायचे. गेल्या सहा महिन्यापासून पीडितेचे आरोपीच्या पत्नीशी प्रेमसंबंध होते. पुढे पिडीत तरुण आरोपीच्या पत्नीला घेऊन हिमाचलला गेला व तिथे त्यांनी कोर्ट मॅरेज केले. यानंतर ते तिथेच राहू लागले. (हेही वाचा: Pet Dog Brutally Beaten in Elevator: सोसायटीच्या लिफ्टमध्ये पाळीव कुत्र्यास बेदम मारहाण, गुरुग्राम येथील घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद)

कालांतराने महिलेच्या पतीने दोघांना हिमाचलमधून आणले आणि संभलमध्ये ओलीस ठेवले. त्यानंतर तरुण गावात परत आल्यानंतर लोकांनी त्याला रस्त्यावर आणून बेदम मारहाण केली. महिलेच्या पतीने आपल्या इतर मित्रांसह त्याला चपलांचा हार घालून, तोंडाला काळे फासून गावात फिरवले. पीडित तरुणाने आरोपीवर त्याला लघवी प्यायला लावल्याचाही आरोप केला आहे. पिडीत तरुणाने चार जणांवर मारहाणीचा आरोप केला होता. घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्याआधारे पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.