Girl Climbs Mobile Tower | Photo Credits: X)

Sholey Style Drama: प्रेमभंगाचे दु:ख अनेकांच्या वाट्याला येते. या दु:खात काही लोक नैराश्येत जातात, भलते उद्यो करतात. काही लोक व्यसणं करतात. काही हायहोल्टेज ड्रामा. उत्तर प्रदेश राज्यातील महाराजागंज जिल्ह्यातील एका तरुणीने असाच काहीसा ड्रामा केला. ज्याची प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरु आहे. या तरुणीला म्हणे तिच्या प्रियकराने म्हणजेच बॉयफ्रेंडने धोका दिला. तसेच, प्रेमासंबंधात राहण्यास आणि विवाहास नकार दिला. हा धक्का सहन न झाल्याने तिने भलतेच पाऊल उचलले. 'शोले स्टाईल' ड्रामा करत ती चक्क मोबाईल टॉवरवर (UP Girl Climbs Mobile a Tower) चढली. हा प्रकार परिसरातील नागरिकांच्या लक्षात आला. पुढच्या काहीच मिनीटांमध्ये बघ्यांची गर्दी जमली.

बघ्यांच्या गर्दीसमोर तरुणीची पोलिसांकडे विनंती

बघ्यांची गर्दी जमल्याने तरुणीलाही भलताच चेव आला. टॉवरवर ती आणखी वर जाऊन बसली. एव्हान पोलिसांनाही खबर मिळाली होती. तेही तातडीने घटनास्थळी आले. त्यांनी तिला खाली उतरण्याची विनंती केली. प्रेमात आंधळी झालेली आणि धोका मिळाल्याने हट्टाला पेटलेली तरुणी थोडीच कोणाच्या ऐकण्याच्या मनस्थितीत होती. तिने जिल्हा पोलीस आणि उपस्थितांसमोर मागणी केली की, जर आपला विवाह आपल्या बॉयफ्रेंडसोबत लावून देणार असाल तरच आपण खाली उतरु अन्यथा नाही. (हेही वाचा, Madhya Pradesh: आईकडून ड्रग्जसाठी पैसे न मिळाल्याने तरुणाचा शोले स्टाईल स्टंट, टॉवरवरून खाली उडी मारण्याची दिली धमकी)

व्हिडिओ

तरुणीचा प्रियकर बेपत्ता

महाराजागंज पोलीसांनी दिलेल्या माहतीनुसार, ही घटना भिटौली पोलीस स्टेशन हद्दीतील सिमरा राजा टोल प्लाझा परिसरात घडली. अनेकांनी या घटनेचे वर्णन 'शोले स्टाईल' घटना म्हणून केले आहे. कारण तरुणीचा हा ड्रामा पाहण्यासाठी परिसरातील अनेक लोक घटनास्थळी दाखल झाले होते. दरम्यान, पोलिसांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले. मुलीला यशस्वीरित्या टॉवरवरुन खाली उतरवण्यात त्यांना यश आले. घटना घडल्यानंतर मुलीचा प्रियकर बेपत्ता असल्याचे समजते आहे. मात्र, पोलिसांनी त्याच्याशी संपर्क साधल्याचे काही प्रसारमाध्यमांनी सूत्रांच्या आधारे म्हटले आहे.

व्हिडिओ

प्रियकराविरोधात शारीरिक छळाची तक्रार

अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, एक 20 वर्षांची तरुणी परिसरातील मोबाईल टॉवरवर चढल्याची माहिती आम्हाला मिळाली. ती प्रियकर अनिल सिब्बन याच्यासोबत विवाह करु इच्छित होती. तशी तिची मागणी होती. ती आणि तिचा प्रियकर एकाच गावचे रहिवासी आहेत. दोघेही पाठिमागील दोन वर्षांपासून परस्परांच्या प्रेमात आहेत. दरम्यान, तिने प्रियकराकडून शारीरिक छळ झाल्याचा आरोप करत 21 नोव्हेंबर रोजी पोलिसांत तक्रारही दिली आहे. सध्या तिला टॉवरवरुन खाली उतरवले असून तिची चौकशी सुरु आहे. दरम्यान, घडल्या प्रकाराची परिसरात जोरदार चर्चा सुरुा आहे. या निमित्ताने तरुणीचा प्रियकरही भलताच चर्चेत आला आहे. ज्याचा सद्या ठावठिकाणा नाही.