UP Assembly Election 2022: भाजपला मोठा धक्का, योगी आदित्यनाथ सरकारमधील मंत्री  स्वामी प्रसाद मौर्य यांचा राजीनामा
Swami Prasad Maurya | (photo Credit - Twitter)

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 (UP Assembly Election 2022) पूर्वीच भाजपला जोरदार झटका (Big setback to BJP) बसला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath ) यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या भाजप सरकारमधील कामगारमंत्री स्वामी प्रसाद मौर्य (Swami Prasad Maurya) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर स्वामी प्रसाद मौर्य यांनी लगेचच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासी संवादही साधला. अखिलेश यादव यांनीही मौर्य यांचे पक्षात स्वागत केले. मौर्य यांच्या प्रवेशावर अखिलेश यादव यांनी म्हटले की, 'सामाजिक न्यायाचा इन्कलाब होईल... 2022 मध्ये बदल घडेल'.

दरम्यान, भाजपला एकापाठोबाठ एक धक्के बसताना दिसत आहेत. स्वामी प्रसाद मौर्य यांच्यानंतर तिलहर येथून आमदार असलेले भाजपचे आमदार रोशन लाल वर्मा यांनीही समाजवादी पक्षात सहभागी झाले आहेत. दुसऱ्या बाजूला तिंदवारी येथऊन भाजप आमदार ब्रिजेश प्रजापती यांनीही राजीनामा दिला आहे.

स्वामी प्रसाद मौर्य यांनी राज्यपाल आनंदीबेन पटेल यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले की, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळात कामगार आणि सेवा समन्वय मंत्र्याच्या रुपात विविध विचारधारांसोबत संघर्ष होऊनही जबाबदारी पार पाडली. परंतू, दलित, मागासवर्गीय आणि शेतकरी, बेरोजगार युवकांची या सरकारने घोर उपेक्षा केली आहे. त्यामुळी मी माझ्या पदावरुन राजीनामा देत आहे. (हेही वाचा,  Assembly Elections 2022 Dates: उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर, गोवा च्या विधानसभा निवडणूका 10 फेब्रुवारी ते 7 मार्च दरम्यान; 10 मार्चला निकाल)

अखिलेश यादव यांनीक मोर्य यांचे स्वागत करत ट्विटरवर म्हटले आहे की, 'सामाजिक न्याय आणि समता-समानतेची लढाई लणारे लोकप्रिय नेते स्वामी प्रसाद मौर्य आणि त्यांच्या सहकारी, कार्यकर्त्यांचे समाजवादी पक्षात स्वागत आहे. अब सामाजिक न्याय का इंक़लाब होगा ~ बाइस में बदलाव होगा' असेही अखिलेश यांनी म्हटले होते.

ट्विट

स्वामी प्रसाद मौर्य यांनी विधानसभा निवडणूक 2017 मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. तत्पूर्वी त्यांनी मायवाती यांच्या बहुजन समाजवादी पक्षातून 2016 मध्ये राजीनामा दिला होता. मोर्य यांना मायावती यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून ओळखले जात असे. स्वामी प्रसाद मौर्य यांची मुलगी संघमित्रा मोर्य बंदायू येथून भाजप खासदार आहेत. मौर्य औबीसी समाजातून येतात. ते अनेक वेळा आमदार राहीले आहेत.