Prakash Javadekar | (Photo Credits-Facebook)

ओटीटी प्लॅटफॉर्म (OTT Platforms ) आणि डिजिटल प्रसारमाध्यमांसाठी (Digital Media) केंद्र सरकार लवकरच आदर्श नियमावली (Guidelines for OTT Platforms ) जारी करण्याच्या विचारात आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar) यांनी रविवारी ही माहिती दिली. जावडेकर यांनी म्हटले की, ओटीटी प्लॅटफॉर्मवर सुरु असलेल्या वेब सीरिजबाबात अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे त्याबाबत माहिती मागविण्यात आली आहे. ओटीटी फ्लॅटफॉर्मला चित्रपट, कार्यक्रम, डिजिटल प्रसारमाध्यमं आदींसाठी प्रेस काऊन्सील, केबल टेलीविजन, सेन्सर बोर्ड कायदा लागू होत नाही. त्यामुळे याच्या संचालनासाठी लवकरच एक नवी व्यवस्था सुरु केली जाणार आहे.

तांडव या वेबसीरिजबाबत नुकताच देशभरात वाद निर्माण झाला होता. या वेब सीरिज विरुद्ध देशभर तक्रारी आणि गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या सीरिजच्या माध्यमातून हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही म्हटले होते की, तांडव या वेबसीरिजबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तेव्हा गृहमंत्र्यांनी म्हटले होते की, केंद्र सरकारला ओटीटी वर वेबसीरिज किंवा चित्रपट रिलीज होतात. त्यासाठी कायद्या करण्याची आवश्यकता आहे. जेणेकरुन अशा घटना पुन्हा होणार नाहीत. (हेही वाचा, Tandav Controversy: 'तांडव'चे निर्माते व कलाकारांना सर्वोच्च न्यायालयाचा झटका; अटकेपासून अंतरिम संरक्षण नाकारले)

दुसऱ्या बाजूला केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही म्हटले आहे की, एक फेब्रुवाीरपासून देशभरातील चित्रपटगृहं कोरोना नियमांचे पालन करुन पूर्णपणे उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. या वेळी बोलताना जावेडकर यांनी सांगितले, एक आनंदरवार्ता आहे. फेब्रुवारीपासून सर्व चित्रपटगृहांमध्ये आपण चित्रपट पाहू शकता. चित्रपटगृहे पूर्ण क्षमतेने उघडण्यास मान्यता देण्या आली आहे. त्यासाठी तिकिटाचे बुकींग ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष खिडकीवरही घेऊ शकता. मात्र, हे सर्व करताना कोरोना व्हायरस नियमांचे पालन करण्याची आवश्यकता असल्याचेही जावेडकर यांनी सांगितले.