Amit Shah Tested Negative COVID-19: केंद्रीय गृहमंंत्री अमित शाह यांंची कोरोनावर मात, मनोज तिवारी यांची ट्विट मधुन माहिती
Amit Shah (Photo: IANS)

Amit Shah Tested Coronavirus Negative: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांंची एका आठवड्यात कोरोनावर मात केली असुन आज त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याची माहिती समोर येत आहे. भाजप खासदार मनोज तिवारी (Manoj Tiwari)  यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली आहे. 2 ऑगस्ट रोजी अमित शाह यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्यांना दिल्ली मधील मेदांंता हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते, या बाबत स्वतः शाह यांनीच ट्विट करुन माहिती दिली होती. अमित शाह यांंना कोरोना झाल्यावर त्यांंची प्रकृती स्थिर होती त्यामूळे त्यांंना केवळ खबरदारी बाळगत हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते आता एका आठवड्यातच त्यांनी कोरोनाला हरवले असल्याचे समजत आहे.

मनोज तिवारी यांनी ट्विट मध्ये याबाबत ट्विट केले असुन अद्याप अमित शाह यांच्याकडुन आपल्या कोविड 19 निगेटिव्ह चाचणीबाबत पुष्टी झालेली नाही. देशाचे यशस्वी गृहमंत्री अमित शाह यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे असे मनोज तिवारी यांचे ट्विट आहे.

मनोज तिवारी ट्विट

दरम्यान, अमित शाह यांना कोरोनाची लागण होण्यावरुन सुद्धा बरेच राजकारण झाले होते. कॉंंग्रेस चे दिग्गज नेते दिग्विजय सिंह यांनी तर तुम्ही अशुभ काळात अयोध्या श्री राम जन्मभुमी मंंदिराचे भूमीपूजन करत असल्याने त्याचा परिणाम म्हणुन अमित शाह यांना कोरोना झाल्याचे म्हंंटले होते.