देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान प्रवाशांसाठी आरोग्य मंत्रालयाने जारी केली नवी नियमावली; जाणून घ्या प्रवासादरम्यान कोणती खबरदारी घ्याल
New Delhi International Airport. (Photo Credit: PTI)

कोरोना व्हायरस (Coronavirus) लॉकडाऊनमुळे (Lockdown) गेल्या काही दिवसांपासून सार्वजनिक वाहतूक ठप्प होती. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात बस, ट्रेन्स सुरु करण्यात आल्या आहेत. तर 25 मे पासून विमानसेवाही सुरु होत आहे. सध्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असून खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रलायाने प्रवासादरम्यान कोणती काळजी घ्यावी, यासाठी विशेष नियमावली जारी केली आहे. यात देशांतर्गत प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी 12 मुद्दे तर आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी 15 मुद्दे मांडण्यात आले आहेत.

विमान, ट्रेन द्वारे देशांतर्गत प्रवास करणाऱ्या किंवा आंतरजिल्हा बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्यांना तिकीटासोबत प्रवासासंबंधित नियमावली देण्यात येईल. तसंच सर्व प्रवाशांना आरोग्य सेतू अॅप मोबाईलमध्ये डाऊनलोड करणे आवश्यक आहे. आरोग्य मंत्रालयाने सर्व प्रवाशांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर विमान, रेल्वे किंवा बस प्रवास करताना आवश्यक खबरदारी घेणे गरजचे असल्याचेही सांगण्यात आले आहे. (मुंबईसह राज्यात 25 मेपासून देशांर्गत विमानसेवा पुन्हा सुरू करण्याबाबत पहा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काय दिले संकेत)

ANI Tweets:

देशांतर्गत प्रवासासाठी नियमावली:

आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी नियमावली:

आंरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या प्रवाशांना 14 क्वारंटाईन राहणे आवश्यक आहे. त्यापैकी 7 दिवस क्वारंटाईन सेंटरमध्ये आणि पुढील 7 दिवस होम आयसोलेशनमध्ये राहणे आवश्यक असल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान 25 मे पासून सुरु होणाऱ्या देशांतर्गत विमानसेवेसंदर्भात नागरी उड्डाण मंत्रालयाने आज विमान कंपन्या आणि विमानतळ संचालकांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत सेवांची कार्यप्रणालीवर चर्चा होणार आहे. तसंच विमानसेवेला नकार देणाऱ्या राज्यांबद्दलही चर्चा होणार आहे. महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाची विमानतळं असणारी ठिकाणं रेड झोनमध्ये असल्याने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देशांतर्गत सेवेला लाल कंदील दाखवला आहे.