Mumbai Airport (Photo Credit: PTI)

देशभरासह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. त्यामुळे लॉकडाउनचे आदेश येत्या 31 मे पर्यंत कायम राहणार असल्याचे राज्य सरकारने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. तर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोरोनाच्या परिस्थिती बाबत एकूणच भाष्य करत नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच येत्या काही काळात कोरोनाची परिस्थिती जरी गंभीर होणार असली तरीही सरकार खंबीर असून त्याबाबत सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे ही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. परंतु आता देशातील विविध राज्याने देशाअंतर्गत विमानसेवा 25 मे पासून सुरु करण्यासाठी हिरवा कंदील दाखवला आहे. पण महाराष्ट्र सरकार मुंबईसह अन्य राज्यात देशाअंतर्गत विमानसेवा सुरु करण्याबाबत विचार करत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.(25 मे पासून देशांतर्गत विमानसेवा सुरु करण्याच्या केंद्राच्या निर्णयाला महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा लाल कंदील; COVID 19 चा धोका वाढण्याची व्यक्त केली भीती)

उद्धव ठाकरे यांनी फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधताना असे म्हटले आहे की, आज सकाळीच नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्यासोबत संवाद साधला आहे. तर हरदीप सिंग पुरी यांना विमान सेवा देशाअंतर्गत सुरु करण्याबाबत आणखी थोडा वेळ द्यावा अशी विनंती केल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.(CM Uddhav Thackeray Facebook live Updates: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन; जाणून घ्या त्यांच्या संबोधनातील महत्त्वाचे मुद्दे)

दरम्यान, राज्यात 31 मे नंतर संपणार का हे आता सांगू शकत नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. मात्र कोरोनाशी कशा प्रकारे यशस्वी लढा दिला जाईल याकडे अधिक भर देण्यात येणार आहे. तसेच सर्दी, खोकला, ताप यांसोबतच थकवा, तोंडाची चव जाणे किंवा वास न येणे ही देखील कोरोनाची प्राथमिक लक्षणे असू शकतात. त्यामुळे तातडीने डॉक्टरांशी संपर्क करा, असे मुख्यमंत्र्यांनी कळकळीचे आवाहन केले आहे.कृषी, मनोरंजन, शिक्षण क्षेत्रात कामकाज सुरु करण्यासाठी परवानगी देण्याचा विचार सुरु आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.