विमानप्रवास (photo Credits : pexels.com )

युनायडेट किंग्डम (United Kingdom) कडून आज भारतातून येणार्‍या प्रवाशांसाठी, विद्यार्थ्यांसाठी मोठी दिलासादायक घोषणा करण्यात आली आहे. आता भारतीय प्रवाशांवरील निर्बंध शिथिल करत युकेने भारताचा 'रेड' लिस्ट (Red List) मधून 'अंबर' लिस्ट (Amber List) मध्ये समावेश आहे. यामुळे पऊर्ण लसीकरण झालेले भारतीय प्रवाशांना ब्रिटन मध्ये आल्यानंतर 10 दिवसांच्या बंधनकारक हॉटेल क्वारंटीन मध्ये राहण्याची अट आता दूर झाली आहे. नक्की वाचा: परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना Adar Poonawalla करणार मोठी मदत; 10 कोटी रुपयांच्या फंडाची घोषणा.

डिपार्टमेंट ऑफ हेल्थ आणि सोशल केअर कडून आज युकेच्या स्थानिक वेळेनुसार 4 नंतर जे भारतीय पूर्णपणे लसीकरण केलेले असतील त्यांना लोकेटर फॉर्म वर दिलेल्या ठिकाणी मग ते घर किंवा ज्या ठिकाणी पुढील मुक्काम असेल तिथेच आयसोलेट राहता येईल. पूर्वी 10 दिवसांसाठी प्रत्येकी 1750 पाऊंड देऊन सरकारी केंद्रांवर क्वारंटीन रहावे लागणार नाही.

इंग्लंड मध्ये आल्यानंतर पुढील 10 दिवस ते जेथे असतील तेथे राहू शकतात. मात्र कोविड टेस्टचा नियम लागू असेल यामध्ये युकेत आल्यावर किंवा 2 दिवस आधी एक टेस्ट आणि आठव्या दिवशी कोविड टेस्ट करणं आवश्यक आहे. सध्या युरोपियन युनियन किंवा अमेरिकेमध्ये दोन्ही लसीचे डोस घेतलेल्यांना क्वारंटीनच्या बंधनातून मुक्त करण्यात आले आहे.

सध्या जगभरात वेगवेगळ्या कोविड 19 लसी नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जात आहेत. यामध्ये युके लसीं किंवा त्यांच्या सर्टिफिकेशन व्यक्तिरिक्त अन्य कोणत्या लसी नागरिकांनी घेतल्या असतील तर त्यांना युके मध्ये प्रवेशासाठी बंधनं होती. पण हळूहळू नियमांमध्ये शिथिलता येत आहे. युके मध्ये या नियमामुळे अनेक विद्यार्थ्यांना फटका बसला आहे. भारतातून युकेत शिकायला जाणार्‍या अनेकांना हा आर्थिक भुर्दंड बसत असल्याने आता सीरम नेच त्यांच्यासाठी मदतीचा हाथ काही दिवसांपूर्वी पुढे केला होता.

सध्या भारत-युके विमानसेवा बंद आहे पण अपवादात्मक स्थितीमध्ये काही प्रमाणात bilateral agreement नुसार मोजक्या फ्लाईट्स सुरू ठेवण्यात आल्या आहेत. भारतात डेल्टा वायरस आल्यानंतर एप्रिल महिन्यात जशी रूग्णसंख्या वाढली तसे युके सरकारने भारतीय प्रवाशांना रेड लिस्ट मध्ये टाकलं होतं. तसेच युकेच्या नागरिकांना देखील रेड लिस्ट असलेल्या देशात प्रवास न करण्याचं आवाहन केले होते.