Television (Photo Credit: PTI/File)

ब्रॉडकास्ट ऑडियंस रिसर्च काउंसिल (Broadcast Audience Research Council) यांनी गुरुवारी (15 ऑक्टोबर) न्यूज चॅलेंजच्या (News Channels) रेटींग्स (Ratings) तीन महिन्यांच्या कालावधीसाठी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. टीव्ही न्यूज चॅनल्सच्या रेटिंग्सबद्दल झालेल्या घोटळ्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. रिपोर्ट्सनुसार, सध्याची टीआरपी (TRP) रेटिंग्स मोजण्याची आणि रिपोर्ट करण्याचे काम नियमांनुसार सुरु राहील, असे BARC ने सांगितले आहे. आम्ही प्रत्येक राज्याच्या भाषेनुसार बातम्या पाहणाऱ्यांची संख्या दर आठवड्याला जारी करु असेही बीएआरसीने (BARC) सांगितले आहे. (टीआरपी म्हणजे काय? दुरचित्रवाणी वाहिन्या खरोखर TRP गडबड करतात का? कोणाला कसा होतो फायदा?)

ब्राडकास्टर्स, जाहिरातदार आणि अॅडव्हटायजिंग एजन्सीतर्फे टीव्ही बघणाऱ्यांची रेटिंग ठरवली जाते. सध्याच्या झालेल्या टीआरपीच्या गोंधळानंतर टीआरपीची आकडमोड करणाऱ्या नियमांची पुन: तपासणी बीएआरसीच्या टेक्निकल टीमकडून केली जाईल. त्यामुळे यापुढे TRP चे योग्य मुल्यमापन केले जाईल आणि असा गोंधळ टाळता येईल, असे BARC आपल्या निवेदनात म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वी बीएआरसीच्या हंसा रिसर्च ग्रुपने तक्रार दाखल केल्यानंतर फेक टीआरपी स्कॅम उघडकीस आला. यात काही टीव्ही चॅनल्स टीआरपीच्या आकड्यांमध्ये घोळ करत असल्याचा दावा बीएआरसीने केला आहे. लोकांच्या घरांचे पॅनल्स आणि मीटर्स चे काम पाहणारे हंसा हे BARC चे एक वेंडर आहे. (Republic TV पाहून तरुणाची आयुक्त परमबीर सिंह यांना धमकी; मुंबई पोलिसांचा दावा)

दरम्यान, काही दिवसांपूर्वी खोट्या टीआरपी रॅकेटचा मुंबई पोलिसांकडून पर्दाफाश करण्यात आला. यात रिपब्लिक टीव्ही, फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमा या चॅनल्सची नावे समोर आली होती. मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी ही माहिती दिली होती. पैसे देऊन खोटा टीआरपी जारी करण्याचे काम काही न्यूज चॅनल्स करत असून त्यासंबंधित पुरावेही असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या प्रकरणाची तपासणी सुरु असून हंसा संस्थेच्या माजी कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले होते.