एक्सप्रेस मधील प्रवाशांना टॉयलेट मधील पाणी विकत असल्याच्या आरोपावरून रेल्वे कर्मचाऱ्याला अटक
प्रातिनिधिक प्रतिमा (File photo)

रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये जेवणाच्या, पाण्याच्या, स्वच्छतेच्या अनेक तक्रारी वारंवार समोर आल्या आहेत मात्र यावेळेस करण्यात आलेली तक्रार ही अत्यंत किळसवाणी म्हणता येईल. तिरुनवेली-जामनगर एक्स्प्रेस  मधील प्रवाशाच्या म्हणण्यानुसार प्रवाशांना टॉयलेटमधील वॉश बेसिन मध्ये वापरले जाणारी पाणी पुरवले जात असल्याचा आरोप रेल्वेच्या कर्मचाऱ्यावर करण्यात आला होता, यावर तात्काळ कारवाई करत या कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाकडून संबंधित व्यक्तीला दहा दिवसाची साधी कोठडी आणि 1,500 रुपयांचा दंड देखील लगावण्यात आला आहे. संबधित आरोपीचे नाव रवींद्र व्यास (Ravindra Vyas) असून तो राजकोटचा रहिवाशी आहे. संबधित माहिती रत्नागिरी रेल्वे पोलिसांकडून  (Ratnagiri Railway Police) करण्यात आली आहे. ठाणे स्थानकात कचऱ्याच्या डब्ब्यात चहाचे ग्लास धुणाऱ्या उपहारगृहाला रेल्वे प्रशासनाकडून 1 लाखांचा दंड

प्राप्त माहितीनुसार, आरोपी रवींद्र व्यास हा कंत्राटी कामगार आहे. त्याच्यावर भारतीय रेल्वे कायद्यातील कलम 144 (1) नुसार बेकायदेशीर विक्रीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे रवींद्र राजकोटच्या रहिवाशी आहे मडगाव येथून गाडीत चढून तो बिनधास्त सील नसलेल्या पाण्याच्या बाटल्या प्रवाशांना विकत होता, पाण्याच्या चवीत फरक आढळल्याने काही जागरूक प्रवाशांनी तक्रार नोंदवली. टॉयलेटमधील वॉश बेसिनचं पाणी व्यास याने प्रवाशांना विकल्याचा आता केवळ संशय आहे.

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे प्रवक्ते गिरीश करंदीकर यांनी माहितीनुसार, रेल्वे प्रवाशांना होणाऱ्या बेकायदा पाणी विक्रीच्या प्रकारांना रोख लावण्यासाठी रेल्वे पोलीस दलाने मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेदरम्यान तिरुनवेली-जामनगर एक्स्प्रेसमध्ये पॅकबंद पाण्याची बेकायदा विक्री होत असल्याची माहिती रत्नागिरी रेल्वे पोलिसांना मिळाली. एक्स्प्रेसच्या एसी डब्यात पोलिसांनी तपासणी केली असता काही प्रवाशांनी अशुद्ध पाणी मिळाल्याची सुद्धा तक्रार केली. या तपासात दोषी रवींद्र व्यास पकडला गेला, आणि मग ही पुढील कारवाई झाली.