Pranab Mukherjee Health Update: माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या प्रकृतीत आजही सुधारणा नाही; अद्याप व्हेंटिलेटरवर
Former President Pranab Mukherjee | File Image | (Photo Credits: PTI)

माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी (Pranab Mukherjee) यांच्या प्रकृती विषयी आज पुन्हा एकदा आर्मीच्या रिसर्च आणि रेफरल हॉस्पिटलमधून (Research and Referral Hospital) अपडेट देण्यात आले आहे. प्रणब मुखर्जी यांच्या प्रकृतीत अद्याप कोणतीही सुधारणा नसल्याचे R&R हॉस्पिटलमधून सांगण्यात आले आहे. त्यांचे क्लिनिकल आणि व्हायटल पॅरामिटर्स (Vital &Clinical Parameters) स्थिर असून ते अजूनही कृत्रिम श्वसन यंत्रणेवरच (Ventilator) आहेत. त्यांना इतर जुने विकार आहेत. दरम्यान तज्ञांद्वारे त्याच्या प्रकृतीवर बारीक लक्ष ठेवले जात आहे.

मेंदूत गाठ झाल्याने 10 ऑगस्ट रोजी प्रणब मुखर्जी यांची ब्रेन सर्जरी पार पडली. त्याच दरम्यान त्यांची कोरोना चाचणी देखील पॉझिटिव्ह आली. शस्त्रक्रियेनंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. तब्बल 6 दिवसांनंतरही त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा दिसून आलेली नाही. (भारताचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी haemodynamically stable; निधनाच्या फेक न्यूजनंतर मुलगा अभिजीत मुखर्जी यांची ट्विटद्वारे माहिती)

ANI Tweet:

कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती प्रणब मुखर्जी यांनी स्वतः ट्विट करुन दिली होती. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्यांना त्यांनी कोविड-19 ची चाचणी करुन घ्यावी आणि स्वतःला आयसोलेट करावे, असे आवाहन त्यांनी केले होते. दरम्यान मुलगा अभिजीत मुखर्जी आणि मुलगी शर्मिष्ठा मुखर्जी हे प्रणब मुखर्जी यांच्या प्रकृतीचे अपडेट्स देत असतात. 13 ऑगस्ट रोजी प्रणब मुखर्जी यांच्या निधनाची खोटी बातमी समोर आली होती. त्यानंतर मुलगा अभिजीत मुखर्जी यांनी ट्विट करुन वडीलांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगत अफवांचे खंडन केले.