Covid 19 Test | Representational Image | (Photo Credits: PTI)

केंद्रीय आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्रालयाने (Health Ministry of India) दिलेल्या ताज्या अपडेट्सनुसार, भारतात (India) मागील 24 तासांत 92,071 नवे रुग्ण आढळले असून 1136 रुग्ण दगावल्याची माहिती मिळत आहे. यामुळे देशात कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 48 लाख 46 हजार 428 वर (Coronavirus Positive Cases) पोहोचली आहे. तर आतापर्यंत एकूण 79,722 (Coronavirus Death Cases) रुग्णांचा मृत्यू झाला आहे. भारतातील हा आकडा कोरोना व्हायरसची गंभीर परिस्थिती दर्शविणारा आहे. कारण मृतांचा एकूण आकडा देखील 79,000 च्या पार गेला आहे. देशात सद्य घडीला 9 लाख 86 हजार 598 रुग्णांवर (Coronavirus Active Cases) उपचार सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.

तर दुसरीकडे देशात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढत असून आतापर्यंत एकूण 37 लाख 80 हजार 108 रुग्णांनी (Coronavirus Recovered Cases) कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी देशात अनलॉक सुरु असले तरीही त्यात काही अटी, नियम घालण्यात आल्या आहेत. Coronavirus Update: महाराष्ट्रात पुणे, मुंबई नंतर 'या' जिल्ह्यात आहेत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण, पाहा जिल्हानिहाय आकडेवारी

देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्र राज्यात असून त्यापाठोपाठ तमिळनाडू, नवी दिल्लीत सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. दरम्यान आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी पुढील वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कोरोनाची लस तयार होईल असे सांगितले आहे. लस तयार झाल्यानंतर लोकांमध्ये कोणत्याही प्रकारची शंका असल्यास मी प्रथम स्वतः ही लस घेईन. ते म्हणाले की जेव्हा ही लस उपलब्ध होईल, तेव्हा सर्वप्रथम आरोग्य कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक आणि अग्रभागी कार्य करणारे कोरोना वॉरियर्स यांना ती दिली जाण्याचा विचार आहे.

सध्या सुरू असलेल्या लसीची चाचणी आणि देशातील विकासाची माहितीही मंत्र्यांनी दिली. सुरक्षित आणि प्रभावी लस नैसर्गिक संसर्गापेक्षा वेगाने कोविड-19 वर प्रतिकारशक्ती निर्माण करण्यास मदत करेल असेही ते म्हणाले. दरम्यान, भारतात गेल्या 24 तासात 94,372 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तसेच 1,114 जणांचा कोरोमुळे बळी गेला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 47,54,357 इतकी झाली आहे. सध्या 9,73,175 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 37,02,596 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. याशिवाय आतापर्यंत 78,586 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.