Coronavirus Update: महाराष्ट्रात पुणे, मुंबई नंतर 'या' जिल्ह्यात आहेत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण, पाहा जिल्हानिहाय आकडेवारी
Coronavirus in Maharashtra | (Photo credit: archived, edited, symbolic images)

महाराष्ट्र आरोग्य मंत्रालयाने (Maharashtra Health Department) दिलेल्या माहितीनुसार, राज्यात काल (13 सप्टेंबर) दिवसभरात 22,543 नवे रुग्ण आढळले असून 416 रुग्णांचा मृत्यू (COVID-19 Death Cases) झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. यामुळे राज्यात कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 10 लाख 60 हजार 308 वर (COVID-19 Positive Cases) पोहोचली आहे. तर दुसरीकडे राज्यात मागील 24 तासांत 11,549 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण 7,40,061 रुग्णांनी कोरोनावर (COVID-19 Recovered Cases) यशस्वीरित्या मात केली आहे. सद्य घडीला राज्यात 2,90,344 (COVID-19 Active Cases) रुग्ण उपचार घेत आहेत.

राज्यात सर्वाधिक रुग्ण हे पुणे (Pune) जिल्ह्यात असून त्यापाठोपाठ मुंबई (Mumbai) आणि ठाण्यात (Thane) कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. पुण्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 2,32,840 वर पोहोचली असून मृतांची एकूण संख्या 4813 वर पोहोचली आहे. तर मुंबईत कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 1,69,741 वर पोहोचली आहे. Coronavirus Update in Maharashtra: महाराष्ट्रात 22,543 नव्या रुग्णांसह राज्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 10 लाख 60 हजार 308 वर

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हा व मनपा निहाय आकडेवारी (13 सप्टेंबर रात्री 8: 00 वाजेपर्यंत)  

जिल्हा उपचार सुरू मृत्यू बरे झालेले रुग्ण संक्रमित रुग्ण
अहमदनगर 6837 435 21745 29017
अकोला 1582 181 3522 5286
अमरावती 2712 187 5529 8428
औरंगाबाद 6991 757 21674 29422
बीड 2126 189 4518 6833
भंडारा 1868 45 1025 2938
बुलढाणा 1847 97 3320 5264
चंद्रपूर 2957 61 2568 5586
धुळे 2029 280 8539 10850
गडचिरोली 293 2 918 1213
गोंदिया 1409 31 1688 3128
हिंगोली 521 47 1494 2062
जळगाव 9921 1023 26177 37121
जालना 1862 170 3926 5958
कोल्हापूर 9468 932 22415 32815
लातूर 4431 350 7696 12477
मुंबई 30316 8150 130918 169741
नागपूर 21522 1356 28003 50885
नांदेड 5787 305 5293 11385
नंदुरबार 1220 99 2673 3992
नाशिक 12860 1058 40714 54632
उस्मानाबाद 2440 235 6024 8699
इतर राज्ये 559 100 428 1087
पालघर 5606 717 24603 30926
परभणी 1391 126 2601 4118
पुणे 77624 4813 150403 232840
रायगड 11056 922 29375 41355
रत्नागिरी 2689 182 3366 6237
सांगली 10361 740 13963 25064
सातारा 8890 596 14833 24321
सिंधुदुर्ग 1139 40 1210 2389
सोलापूर 7116 955 19117 27189
ठाणे 29531 4162 123222 156916
वर्धा 845 25 1361 2232
वाशिम 736 52 1968 2757
यवतमाळ 1802 111 3232 5145
एकूण 290344 29531 740061 1060308

तर भारतातील कोरोनाग्रस्तांनी 47 लाखांचा आकडा पार केला आहे. गेल्या 24 तासात देशात 94,372 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तसेच 1,114 जणांचा कोरोमुळे बळी गेला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 47,54,357 इतकी झाली आहे. सध्याj9,73,175 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 37,02,596 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.