Coronavirus Update in Maharashtra: महाराष्ट्रात 22,543 नव्या रुग्णांसह राज्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 10 लाख 60 हजार 308 वर
Coronavirus Outbreak | Representational Image | (Photo Credits: IANS)

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने (Coronavirus) अक्षरश: हैदोस घातला असून महाराष्ट्र आरोग्य मंत्रालयाने (Maharashtra Health Department) दिलेल्या अपडेट्सनुसार, राज्यात मागील 24 तासांत 22,543 नवे रुग्ण आढळले असून 416 रुग्ण दगावल्याची (COVID-19 Death Cases) माहिती मिळत आहे. यामुळे राज्यात कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 10 लाख 60 हजार 308 वर पोहोचली (COVID-19 Positive Cases) आहे. तर दुसरीकडे राज्यात मागील 24 तासांत 11,549 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण 7,40,061 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात (COVID-19 Recovered Cases) केली आहे. सद्य घडीला राज्यात 2,90,344 रुग्ण (COVID-19 Active Cases) उपचार घेत आहेत.

महाराष्ट्र आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 69.8% इतके झाले आहे. तर मृत्यूदर 2.79% इतके झाले आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 52 लाख 53 हजार 676 कोरोना चाचण्या झाल्या असून 10 लाख 60 हजार 308 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सद्य घडीला 16,83,770 रुग्ण होम क्वारंटाईन असून 37,294 रुग्ण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. Coronavirus in Mumbai: मुंबई मधील कोरोना बाधितांचा आकडा 1,69,693 वर; आज 2,085 नव्या रुग्णांची भर, 41 जणांचा मृत्यू

तर भारतातील कोरोनाग्रस्तांनी 47 लाखांचा आकडा पार केला आहे. गेल्या 24 तासात देशात 94,372 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तसेच 1,114 जणांचा कोरोमुळे बळी गेला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 47,54,357 इतकी झाली आहे. सध्या 9,73,175 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 37,02,596 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.