लवकरच टळू शकते YES Bank वरील संकट; SBI बँकेतील मोठा हिस्सा खरेदी करण्यास उत्सुक- अर्थमंत्री निर्मला सीतारमण
Union Finance Minister Nirmala Sitharaman. (Photo Credit: PTI)

आरबीआयने (RBI) येस बँकेवर (YES Bank) स्थगिती आणल्यानंतर व पैसे काढण्याची मर्यादा निश्चित केल्याच्या अवघ्या एक दिवसानंतर, अर्थमंत्री निर्मला सीतारमण (FM Nirmala Sitharaman) यांनी याबाबत विशेष पत्रकार परिषद घेतली. अर्थमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, येस बँकेला पुन्हा रुळावर आणण्यासाठी, देशातील सर्वात मोठी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), येस बँकेचा मोठा हिस्सा खरेदी करणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आपल्या वेबसाइटवर येस बँकेच्या पुनर्रचनेविषयी सविस्तर माहिती दिली आहे. निर्मला सीतारनम यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, 2011 पासून येस बँक आरबीआयच्या सतत देखरेखीखाली आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी तपास संस्था करणार आहेत.'

त्या पुढे म्हणाल्या, 'मार्च 2019 मध्ये बँकेला 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. भारतीय सुरक्षा आणि विनिमय मंडळ (सेबी) सप्टेंबर 2019 पासून या प्रकरणाची चौकशी करत आहे. गेल्यावर्षी मे आणि जूनमध्येही बँकेला दंड ठोठावण्यात आला होता. सप्टेंबर 2019 मध्ये येस बँकेच्या माजी प्रवर्तकांचा संपूर्ण हिस्स्याची विक्री झाली आहे. नोव्हेंबर 2019 मध्येच हे स्पष्ट झाले होते की बँकेला स्वतःला तारण्यासाठी कोठूनही भांडवल मिळणार नाही.' (हेही वाचा: Yes Bank Crisis: बँक खात्यामधील पैसे सुरक्षित, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा खातेधारकांना विश्वास)

आरबीआयला या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच एसबीआयने येस बँकेत हिस्सा खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे, त्यामुळे लवकरच बँकेची गाडी रुळावर येईल. आता येस बँकेत नवनियुक्त प्रशासकानंतर नवीन बोर्ड स्थापन केले जाईल. आरबीआयने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर बँक पुनर्गठन योजनेची माहिती दिली आहे. पूर्वीप्रमाणे नवीन बोर्ड तयार झाल्यानंतर बँक ठेवी आणि दायित्वांवर परिणाम त्याचा होणार नाही. तसेच बँक कर्मचार्‍यांच्या नोकर्‍या व पगार पुढील एक वर्षासाठी सुरक्षित असल्याची माहितीही निर्मला सीतारमण यांनी दिली.