Yes Bank Crisis: बँक खात्यामधील पैसे सुरक्षित, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा खातेधारकांना विश्वास
निर्मला सीतारमण (Photo Credits: IANS)

येस बँक (Yes Bank) प्रकरणी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी खातेधारकांना त्यांचे पैसे सुरक्षित असून बुडणार नसल्याचे वचन दिले आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, खातेधारकांना याबाबत चिंता होण्याची गरज नाही आहे. बँक खातेधारकांचे पैसे सुरक्षित असून आरबीआयचे अधिकारी यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तसेच येस बँकेच्या सर्व प्रकारावर आमचे लक्ष कायम असणार आहे. आरबीआयकडून येस बँक प्रकरणी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. जी पावले उचलली गेली आहेत ती खातेधारकांसाठी, बँक आणि अर्थव्यवस्थेच्या हितासाठी आहे. गेल्या काही महिन्यांपासून येस बँकची ही स्थिती नव्हती. परंतु हा प्रकार अचानक घडल्याने त्यावर नजर ठेवली जात आहे.

निर्मला सीतारमण यांनी असे म्हटले आहे की, मी खातेधारकांना आश्वासन देते की तुमचे पैसे सुरक्षित आहेत. मी सातत्याने आरबीआयसोबत संपर्कात आहे. गव्हर्नर यांनी या प्रकरणी तोडगा निघेल असा विश्वास दर्शवला आहे. यापूर्वी आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी बँकच्या संबंधित मुद्द्यांवर लवकरच समाधान होईल असे म्हटले आहे. तर खातेधारकांना खात्यामधून पैसे काढण्यासाठी 30 दिवसांचा कालावधी दिला आहे.(Yes Bank खातेदारांची बँक, एटीएम कडे धाव; मात्र ATM मध्ये खळखळाट)

दरम्यान, आरबीआय यांनी येस बँकेच्या ग्राहकांसाठी 50 हजर रुपये खात्यामधून काढण्याची मुभा दिली आहे. आरबीआयने ही कारवाई बँकेची स्थिती पाहून केली आहे. आरबीआयचा हा आदेश येस बँकेला पुढील एक महिनाभर पाळायचा आहे. अर्थमंत्रालयाने त्यांच्या अधिसूचनेत असे म्हटले आहे की, हा नियम गुरुवारी संध्याकाळी सहा वाजल्यापासून लागू झाला असून तीन एप्रिल पर्यंत कायम राहणार आहे.