Thane - Mumbra: ठाणे येथील मुंब्रा परिसरात AIMIM कार्यकर्त्यावर तलावर हल्ला, दोन गंभीर जखमी (व्हिडिओ)
AIMIM in Kalwa-Mumbra |(Photo Credit - Twitter)

ठाणे (Thane) येथील मुंब्रा (Kalwa-Mumbra) परिसरात असदुद्दीन ओवेसी यांच्या ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (All India Majlis-e-Ittehadul Muslimeen) पक्ष कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला केला आहे.अज्ञात हल्लेखोरांनी पक्ष कार्यालयात घुसून हल्ला केला. या हल्ल्यात दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. गुरुवारी (22सप्टेंबर) रोजी रात्री 8 ते 9 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाला आहे. एमआयएमचे कळवा मुंब्रा विधानसभा अध्यक्ष सैफ पठाण यांच्यावर हल्ला करण्याच्या हेतूने हल्लेखोर आले होते. मात्र, पठाण हे काही कामानिमित्त बाहेर गेले असल्याने त्यांनी कार्यालयातील कार्यकर्त्यांवर हल्ला केल्याचे सांगितले जात आहे. हल्लेखोरांनी पक्ष कार्यालयातील दोघांवर लोखंडी रॉ़ड, तलवार आणि चाकुने हल्ला केला.

बिलाल काजी आणि फौज मान्सून असे दोघे जण या हल्ल्यात जखमी झालेल्यांची नावे असल्याचे समजते. दोघांनाही उपचारासाठी जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्ला झाल्याचे लक्षात येताच स्थानिकांनी घटनास्थळी गर्दी केली. जमलेली गर्दी पाहून हल्लेखोरांनी घटनास्थळावरुन पळ काढला.

दरम्यान, सैफ पठाण पठाण यांना घटनेची माहिती कळताच त्यांनी तातडीने मुंब्रा पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. अज्ञात हल्लेखोरांनी आपल्या कार्यालयात येऊन कार्यालयातील लोकांवर जीवघेणा हल्ला केला. त्याचे सीसीटीव्ही फुटेजही उपलब्ध आहे. या आधीही आपल्याला जीवे मारण्याच्या अनेक वेळा धमक्या आल्या होत्या. याबाबत आपण वेळोवेळी पोलिसांशी पत्रव्यवहार केल्याचेही त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. (हेही वाचा, MIM On Google Map: औरंगाबादचे नाव संभाजीनगर केल्यामुळे एमआयएम आक्रमक, गुगल मॅपविरोधात तक्रार दाखल करणार)

ट्विट

या हल्ल्यात बिलाल काजी आणि फौज मान्सून या दोघांना दुखापत झाली आहे. स्थानिकांनी जखमींना रुग्णालयात दाखल केलं आहे. हल्ला केल्यानंतर अज्ञात आरोपींनी पोबारा केला. याप्रकरणी सैफ यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात धाव घेत आपल्या कार्यालयात घडलेला सर्व प्रकार सांगून सीसीटीव्हीच्या आधारे तक्रार दाखल केली आहे. सैफ यांना याआधी देखील जीवे मारण्याच्या धमक्या अनेक वेळा आल्या होत्या. त्यानंतर त्यांनी आपल्याला धमकी देणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला होता. मात्र