प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Twitter)

अवघ्या 8 आणि 9 वर्षांच्या दोन भावांनी त्यांच्या घरातून सुमारे चार लाख रुपयांची चोरी केली आहे. ही मुले महिनाभर घरातील कपाटातून पैसे चोरत राहिली, मात्र याचा त्यांच्या पालकांना थांगपत्ता देखील लागला नाही. या चोरीची बाब पालकांनी समजू नये म्हणून मुलांनी एक युक्ती शोधून काढली होती. ही मुले चोरलेल्या नोटांच्या जागी बनावट नोटा (Fake Notes) ठेवत होती. साधारणपणे 20-25 दिवस असे चालले, मात्र जेव्हा पालकांना कपाटात खोट्या नोटा आढळून आल्या, तेव्हा ही बाब समोर आली.

ही घटना तेलंगणातील हैदराबादमधील जीडीमेटला भागातील सांगितली जात आहे. डेक्कन क्रॉनिकलच्या रिपोर्टनुसार, सुमारे एक महिन्यापूर्वी, 8 आणि 9 वर्षांच्या दोन भावांनी त्यांचे वडील शिव शंकर यांना कपाटात पैसे ठेवताना पाहिले. शिवशंकर हे एका फार्मा कंपनीत काम करतात. दोन्ही भावांनी ही गोष्ट त्यांच्या शेजारी राहणाऱ्या दोन तरुणांना सांगितली. त्यानंतर या तरुणांच्या सांगण्यावरून मुलांनी कपाटातील पैसे चोरण्यास सुरुवात केली.

चोरलेले पैसे मुलांनी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या तरुणांना द्यायला सुरुवात केली. या मुलांचे वय 13 आणि 14 वर्षे असून ते इयत्ता 9 वीत शिकत आहेत. दोन्ही भाऊ कपाटात ठेवलेले खरे पैसे चोरून त्या जागी आपल्या बनावट 'चिल्ड्रन्स बँक' नोटा ठेवत असता. अशाप्रकारे त्यांनी त्यांच्या घरातील कपाटातून एका महिन्यात सुमारे 4 लाख रुपये चोरले. (हेही वाचा: मध्य प्रदेशात भिकारी असलेल्या संतोष कुमार याने पत्नीला गिफ्ट केली 90 हजारांची Moped Motorcycle)

एका महिन्यात या मुलांनी घड्याळे, मोबाईल, खाद्यपदार्थ, चित्रपटाची तिकिटे आणि ऑनलाइन गेमवर 4 लाख रुपये खर्च केले. कपाटातील पैसे तपासल्यानंतर पालकांना बनावट नोटा आढळून आल्या. त्यानंतर त्यांनी मुलांकडे चौकशी केली असता सत्य बाहेर आले. आता पालकांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे.