
Telangana: तेलंगणामधील महबूबा जिल्ह्यातील अल्पवयीन मुलांना बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तर या प्रकरणी दोन जणांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. दोन अल्पवयीन मुले आंब्याच्य बागेत आले. त्यानंतर तेथील गार्ड्सने त्यांना बांधून खुप मारहाण केली. ऐवढेच नाही तर जबरदस्तीने शेण सुद्धा खायला घालण्याचा त्यांच्यासोबत प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात तुफान व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आता कारवाई केली आहे.
आरोप असा आहे की, महबूबाबाद येथील थोरुर जिल्ह्यातील 13 वर्षीय आणि 16 वर्षीय अल्पवयीन मुलांनी आंब्याच्या बागेत घुसण्याचा प्रयत्न केला. तेथील झाडावरील काही आंबे सुद्धा त्यांनी तोडले. त्याचवेळी तेथे असलेल्या गार्ड्सने त्यांना पाहिले आणि पकडले.(Coronavirus: कोरोनाच्या वाढत्या घटनांमध्ये जनतेचा निष्काळजीपणा; देशात तब्बल 50 टक्क्यांहून अधिक लोक घालत नाहीत मास्क- Government Survey)
त्याचवेळी तातडीने गार्ड्स पुढे येत त्यांनी दोन मुलांना दोरीने घट्ट बांधून त्यांना मारहाण केली. गार्ड्स यावर न थांबता त्यांनी मुलांना शिक्षा म्हणून गोबर सुद्धा खायला लावण्याचा प्रयत्न केला. हे प्रकरण ज्यावेळी समोर आले तेव्हा पोलिसांनी तातडीने दोन्ही मुलांना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दोन्ही मुलांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी कलम 342,324 अंतर्गत दोन्ही गार्ड्सला अटक केली आहे. तर मुलांचे असे म्हणणे आहे की, त्यांनी बागेतील आंब्यांची चोरी केली नाही. मात्र तेथे आपला हरवलेला कुत्रा शोधण्यासाठी बागेत गेले होते.