Tejas Express येत्या 17 ऑक्टोंबर पासून पुन्हा धावणार; लखनौ-नवी दिल्ली आणि अहमदाबाद-मुंबई मार्गाने नागरिकांना प्रवास करताना 'या' नियमांचे करावे लागणार पालन
Tejas Express (Photo Credits: Instagram)

तेजस एक्सप्रेस मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. कारण जवळजवळ 7 महिन्यानंतर पुन्हा एकदा येत्या 17 ऑक्टोंबर पासून तेजस एक्सप्रेस नागरिकांसाच्या सेवेसाठी सुरु करण्यात येणार आहे. कोरोना व्हायरसच्या कारणामुळे लखनौ-नवी दिल्ली आणि अहमदाबाद-मुंबई मार्गाने धावणारी तेजस एक्सप्रेस बंद ठेवण्यात आली होती. मात्र आता पुन्हा याच मार्गाने ती पुढील आठवड्यापासून नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहे. पण कोरोनाची परिस्थिती पाहता प्रवाशांना प्रवासावेळी काही नियमांचे पालन करावे लागणार आहे.(Indian Railways: सणासुदीच्या काळात प्रवाशांना भारतीय रेल्वेकडून भेट; ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या कालावधीमध्ये चालवणार 200 अतिरिक्त गाड्या)

आयआरसीटीसीने रेल्वे सुरु होणार असल्याने संपूर्ण तयारी केली आहे. तसेच एक्सप्रेसचे व्यवस्थापित आणि ऑपरेट संबंधित कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी एक विस्तृत कार्यक्रम चालवला आहे. हे प्रशिक्षण मिळाल्यानंतर कर्मचाऱ्यांना कोविड19 च्या महासंकटाच्या काळात प्रवाशांपर्यंत सुविधा पोहचवण्यासाठी नवी माहिती दिली आहे. (Amazon च्या वेबसाईट आणि अॅपवरही IRCTC च्या तिकीट बुकींगची सुविधा; पहा, कसे कराल ऑनलाईन तिकीट बुकींग?)

नागरिकांनी प्रवास करताना 'या' नियमाचे पालन करावे

-सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचे पालन करत प्रत्येक सीटच्या मध्ये एक जागा सोडली जाणार आहे.

-प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना फेस मास्क लावणे अनिवार्य असणार आहे.

-ट्रेनमध्ये प्रवास करण्यापूर्वी प्रवाशांना आरोग्य सेतु अॅप मोबाईलमध्ये डाऊनलोड करावा लागणार आहे. तसेच मोबाईल मध्ये आहे की नाही ते सुद्धा दाखवावे लागणार आहे.

-ट्रेनची तिकिट बुकिंग करताना सविस्तर सुचना दिल्या जाणार आहेत.

-कोचमध्ये चढण्यापूर्वी प्रवाशाची थर्मल स्क्रिनिंग करण्यात येणार आहे.

-सर्व प्रवाशांना कोविड19 पासून बचाव करण्यासंदर्भातील कीट दिली जाणार आहे. त्यात फेस मास्क, सॅनिटायझर, फेस शील्ड आणि ग्लोव्सचा समावेश असणार आहे.

-प्रवाशांचे सामान निर्जंतुकीकरण करण्यासाठी खास स्टाफची नेमणूक केली जाणार आहे.

-कोचच्या आतमध्ये वारंवार स्पर्श होणाऱ्या भागाची साफसफाई वेळोवेळी केली जाणार आहे.

-तेजस एक्सप्रेसच्या ट्रेनची बुकिंग आयआरसीटीसीची ई-तिकिट वेबसाईट www.irctc.co.in वर केली जाणार आहे.

लखनौ-नवी दिल्ली आणि अहमदाबाद-मुंबई दरम्यान धावणारी तेजस एक्सप्रेस कोविड19 मुळे मार्च पासून बंद करण्यात आली होती. अशी अपेक्षा केली जात आहे की, दोन्ही ट्रेन पुन्हा सुरु झाल्यानंतर सणासुदीच्या काळात प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. प्रवाशांसाठी सुद्धा कोरोनाची परिस्थिती पाहता SOP चे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.