
राजद प्रमुख लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांनी त्यांचा मुलगा तेजप्रताप यादव (Tej Pratap Yadav) यांना पक्षामधून पुढील 6 वर्षांसाठी काढून टाकल्याची पोस्ट केली आहे. तेजप्रताप यांनी नुकत्याच त्यांच्या रिलेशनशीप बद्दल फोटोमधून माहिती दिली आहे. तेज प्रताप यादव यांनी त्यांच्या अनुष्का यादव नावाच्या प्रेयसीसोबतचा एक फोटो शेअर केला होता. नंतर, त्याने सोशल मीडिया पोस्ट अनेक वेळा सुधारल्या आणि नंतर सांगितले की त्याचे सोशल मीडिया अकाउंट हॅक झाले आहे. तेज प्रताप यांनी अनुष्का सोबत 12 वर्ष रिलेशनशीप मध्ये असल्याचं कालच्या पोस्ट मध्ये म्हटलं होतं.
लालू प्रसाद यादव यांची पोस्ट
निजी जीवन में नैतिक मूल्यों की अवहेलना करना हमारे सामाजिक न्याय के लिए सामूहिक संघर्ष को कमज़ोर करता है। ज्येष्ठ पुत्र की गतिविधि, लोक आचरण तथा गैर जिम्मेदाराना व्यवहार हमारे पारिवारिक मूल्यों और संस्कारों के अनुरूप नहीं है। अतएव उपरोक्त परिस्थितियों के चलते उसे पार्टी और परिवार…
— Lalu Prasad Yadav (@laluprasadrjd) May 25, 2025
लालू यादव यांनी X वर केलेल्या पोस्ट मध्ये, "वैयक्तिक जीवनात नैतिक मूल्यांकडे दुर्लक्ष केल्याने सामाजिक न्यायासाठीचा आपला सामूहिक संघर्ष कमकुवत होतो. मोठ्या मुलाचे बेजबाबदार वर्तन हे आपल्या कौटुंबिक मूल्ये आणि परंपरांनुसार नाही." म्हणून, वरील परिस्थितीमुळे, मी त्याला पक्ष आणि कुटुंबातून काढून टाकत आहे. असं म्ह्टलं आहे. राजद प्रमुख लालू यादव पुढे म्हणाले, "ते स्वतः त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील चांगले-वाईट आणि गुण-दोष पाहण्यास सक्षम आहेत. त्यांच्याशी संबंध ठेवणाऱ्यांनी स्वतःच्या विवेकबुद्धीने निर्णय घ्यावा. मी नेहमीच सार्वजनिक जीवनात सार्वजनिक लज्जेचा पुरस्कर्ता आहे." Tejaswi vs Tej Pratap In Bihar: राष्ट्रीय जनता दल पक्षात पुन्हा एकदा तेजस्वी विरुदध तेजप्रताप, सुप्रीमो लालू प्रसाद यादव कोणाच्या बाजूने?
तेज प्रताप यांचे विवाहबाह्य संबंध?
लग्नानंतर काही महिन्यांतच दोघांमध्ये मतभेद सुरू झाले.ऐश्वर्याने तेज प्रतापवर मारहाण, ड्रग्ज घेणं आणि क्रॉस ड्रेसिंगसारखे गंभीर आरोप केले. घटस्फोटाचा खटला न्यायालयात आहे आणि ऐश्वर्याने लालू कुटुंबावर तिचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा आरोपही केला आहे.
आता प्रश्न असा आहे की जर तेज प्रताप अनुष्कासोबत 12 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते, तर त्यांनी ऐश्वर्याशी लग्न का केले? काही विश्लेषकांचा असा विश्वास आहे की हे लग्न राजकीय फायद्यासाठी आणि कुटुंबांमधील युतीसाठी केले गेले होते.केंद्रीय मंत्री जीतन राम मांझी यांनी लालू कुटुंबावर निशाणा साधताना म्हटले आहे की, 'निवडणुकीत ऐश्वर्यासोबत जे घडले त्याचा बदला बिहारच्या महिला घेतील.'