Tamil Nadu Assembly Election 2021:  DMK नेते A Raja यांच्यावर 48 तासांसाठी प्रचारबंदी; आक्षेपार्ह वक्तव्यामुळे निवडणूक आयोगाचा निर्णय
A Raja | (File Photo)

तामिळनाडू विधानसभा निवडणूक 2021 (Tamil Nadu Assembly Election 2021) मध्ये आक्षेपार्ह वक्तव्य केले प्रकरणी द्रविड मुनेत्र कझगम (DMK ) पक्षाचे नेते ए. राजा (A Raja) यांच्यावर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई केली आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री ईपीएस पलानीस्वामी (Edappadi K. Palaniswami) यांच्याविरुद्ध अपमानास्पद टिप्पणी केल्याुळे ए. राजा (A Raja) यांच्यावर 48 तासांसाठी निवडणुक प्रचारास बंदी घालण्यात आली आहे. ए राजा यांनी पलानीस्वामी यांच्यावर केलेली टिप्पणी इतकी आक्षेपार्ह होती की ती जाहीर प्रसिद्धही करता येऊ शकत नाही. टिप्पणीमुळे ए राजा यांच्यावर सर्वपक्षीयांकडून टीका करण्यात येत होती. सत्ताधारी एआयएडीएमके (AIADMK) पक्षाने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची नोंद घेत निवडणूक आयोगाने राजा याच्यावर प्रचारबंदीची कारवाई केली.

ए राजा यांनी आपल्या विधानाचे गांभीर्य लक्षात येताच झालेल्या वक्तव्याबाबत माफी मागितली होती. परंतू, माफी मागूनही ए राजा यांच्यावर होणारी टीका थांबली नव्हती. (हेही वाचा, Tamil Nadu Assembly Elections 2021: विदेशी गायींचे दूध प्यायल्याने भारतीय महिलांनी फिगर गमावली; द्रमुक नेते Dindigul Leoni यांचे वादग्रस्त विधान)

तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी 6 एप्रिल या दिवशी मतदान होत आहे. या निवडणुकीत तामिळनाडूमध्ये AIADMK विरुद्ध DMK अशी पारंपरीक लढत पाहायला मिळत आहे. काँग्रेस पक्षाने दिवंगत एम करुणानिधी यांचा पक्ष डीएमके सोबत आघाडी केली आहे. तर भाजपने AIADMK सोबत हातमिळवणी केली आहे. तामिळनाडू राज्यातील एक दमदार नेते दिवंगत जयराम जयललिता आणि एम करुनानिधी यांच्या निधनानंतर राज्यात प्रथमच विधानसभा निवडणूक पार पडत आहे.