Sushant Singh Rajput | (Photo Credits: Facebook)

केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (Central Bureau of Investigation) म्हणजेच सीबीआ (CBI) द्वारा सुरु असलेला सुशांत सिंह आत्महत्या (Sushant Singh Rajput Case ) प्रकरणाचा सुरु असलेला तपास पूर्ण झाला आहे. या तपासाचा अहवाल सीबीआय लवकरच न्यायालयाकडे सपूर्त करणार आहे. विशेष म्हणजे या तपासात कोणत्याही प्रकारे सुशांत याच्या हत्येचा पुरावा आढळून आला नसल्याचा दावा प्रसारमाध्यमांनी सूत्रांच्या आधारे केला आहे. या प्रकरणात आरोपी असलेली अभिनेत्री आणि सुशांत सिंह याची प्रेयसी रिया चक्रवर्ती हिच्याबाबतचा निर्णय न्यायालयानेच घ्यावा, असे सीबीआयचे म्हणने असल्याचा दावाही प्रसारमाध्यमांनी केला आहे. दरम्यान, सीबीआयने मात्र सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्याच्या वृत्ताचे खंडण केरत हा तपास अद्यापही सुरु असल्याचे म्हटले आहे.

मुंबई येथील वांद्रे परिसरात असलेल्या राहत्या घरी सुशांत सिंह राजपूत याचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला होता. सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्या का केली याचा तपास मुंबई पोलीस करत होते. दरम्यानच, सुशांत सिंह याची हत्या झाली असावी असा मुद्दा पुढे आला. मुंबई पोलीस या दिशेनेही तपास करत होते. तोपर्यंत सुशांतच्या वडिलांनी बिहार पोलिसांकडे एक तक्रार दाखल केली आणि या प्रकरणाला नाट्यमय वळण मिळाले. (हेही वाचा, Rhea Chakraborty and Sushant Singh Rajput Smoking Video: रिया चक्रवर्ती आणि सुशांत सिंह राजपूत चा 'स्मोकिंग व्हिडिओ' व्हायरल)

बिहार पोलिसांकडे सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी तक्रार दाखल होताच त्यांनी ती सीबीआयकडे वर्ग करवी अशी मागणी केली. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडे असावा की, सीबीआयकडे याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. केंद्रीय संस्था म्हणून न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला.

दरम्यान, या प्रकरणात सुशांत सिंह राजपूत यांची बहिण रिया चक्रवर्ती हिला अटक करण्यात आली. पुढे याच प्रकरणात ड्रग्जचा मुद्दा पुढे आला. ड्रग्जच्या प्रकरणात एनआयए तपास करत आहे. दरम्यान, 'सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास तरी पूर्ण झाला असून त्याबाबतचा अहवाल सीबीआय न्यायालयाकडे सुपूर्त करेन', असे प्रसारमाध्यमांनीम्हटले आहे.