Rhea Chakraborty and Sushant Singh Rajput Smoking Video: रिया चक्रवर्ती आणि सुशांत सिंह राजपूत चा 'स्मोकिंग व्हिडिओ' व्हायरल
रिया चक्रवर्ती आणि सुशांत सिंह राजपूत (Photo Credits: YouTube)

Rhea Chakraborty and Sushant Singh Rajput Smoking Video: दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत  (Sushant Singh Rajput) याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty)  यांचा एक नवा व्हिडिओ समोर आला आहे. त्यामध्ये रोल्ड सिगरेटचे सेवन करताना दिसून येत आहेत. व्हिडिओ पाहून असे वाटते की, सुशांत त्याचा जवळच्या मित्राच्या घरी दिसून येत आहे. व्हिडिओत तो स्मोकिंग करताना गाणे सुद्धा गात आहे. सुशांतसह रिया चक्रवर्ती सुद्धा असून ती ही स्मोकिंग करताना दिसून येत आहे. परंतु व्हायरल झालेला हा व्हिडिओ खरा आहे की खोटा याची पुष्टी करण्यात आलेली नाही.

व्हिडिओमध्ये एकजण सुशांतला विचारतो, हे चरस आहे का? यावर सुशांत असे उत्तर देतो की, हे वीएफएक्स आहे. म्हणजेच हा एक सिनेमांमध्ये वापरण्यात येणाऱ्या व्हिज्युअल टेक्नॉलॉजीचा एक भाग आहे. पुढे रिया यावर असे म्हणते की, हा एक रोल आहे. व्हिडिओ बनवणारा व्यक्ती असा म्हणतो की, ही हर्बल स्टिक आहे. यावर सुशांत पुन्हा एक भंकस करत म्हणतो हे व्हिएफएक्स आहे. व्हिडिओत रिया सुशांत याला 'आय लव्ह यू' असे म्हटते. यावर सुशांत यावर म्हणतो की, मी अशीच आशा करत आहे.(Sushant Singh Rajput Case: ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी NCB च्या अटकेत असलेल्या रिया चक्रवर्ती कडून अभिनेत्री सारा अली खान, रकुल प्रीत सिंह यांच्यानावाचा खुलासा)

इंडिया डॉट कॉम यांच्या रिपोर्ट्सनुसार, झी न्यूज यांच्याकडून जाहीर करण्यात आलेल्या या व्हिडिओत सुशांत नशेत असल्याचे दिसून येत आहे. सुशांत याचा रुममेट सिद्धार्थ पिठानी आणि सॅम्युअल सुद्धा असून ते गिटार वाजवत आहेत. सुशांत याने 14 जूनला मुंबईतील आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. त्यानंतर या प्रकरणी आता सीबीआय, एनसीबी आणि ईडी कडून तपास केला जात आहे.