Sushant Singh Rajput Case: ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी   NCB च्या अटकेत असलेल्या रिया चक्रवर्ती कडून अभिनेत्री सारा अली खान, रकुल प्रीत सिंह यांच्यानावाचा खुलासा
Rhea Chakraborty, Rakul Preet Singh, Sara Ali Khan (Photo Credits: Instagram)

मागील 3 महिन्यांपासून अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या आतमहत्येमागील गुढ शोधण्यासाठी विविध तपास यंत्रणा काम करत आहे. जसा तपास वाढतोय तशा अनेक धक्कादायक गोष्टी आणि झगमगत्या ग्लॅमरस बॉलिवूड विश्वातील धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. सध्या सुशांत आत्महत्या प्रकरणामध्ये ड्रग्ज कनेक्शन मध्ये अटकेत असलेली सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हीने एनसीबीकडे (NCB) बॉलिवूडमधील काही मोठी नावं घेतल्याची चर्चा आहे. दरम्यान टाईम्स नाऊच्या रिपोर्ट्स नुसार, यामध्ये अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan), रकुल प्रीत सिंह (Rakul Preet Singh) आणि फॅशन डिझायनर सिमोन खंभाट्टा (Simone Khambatta) यांच्या नावाचा खुलासा रियाने केला आहे. रियाकडून 25 सेलिब्रिटींच्या नावांची पोलखोल करण्यात आल्याची चर्चा आहे. Sushant Singh Rajput Case: रिया चक्रवर्तीसह तिचा भाऊ शौविक आणि ड्रग्ज प्रकरणाशी संबंधित अन्य 5 आरोपींचे जामीन अर्ज मुंबई विशेष कोर्टाने फेटाळले.  

रिया चक्रवर्ती कडून बॉलिवूडच्या A स्टार्सची नावं समोर आल्याने बॉलिवूड क्षेत्रात खळबळ माजली आहे. दरम्यान रियाने खुलासा केल्यानंतर आता एनसीबीकडून त्यांची देखील चौकशी होण्याची शक्यता आहे. कदाचित एनसीबी येत्या काही काळात अभिनेत्री सारा अली खान, रकुल प्रीत सिंह आणि फॅशन डिझायनर सिमोन खंभाट्टा यांना समन्स पाठवून त्यांना चौकशीसाठी बोलावू शकते असं सांगण्यात आले आहे. रियाकडून बड्या सेलिब्रिटींच्या नावाचा खुलासा झाल्यानंतर आता #RheaNamesBTownStars हा हॅशटॅग ट्वीटर वर ट्रेंड होण्यास सुरूवात झाली आहे.

दरम्यान सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणामध्ये अटकेत असलेल्या रिया चक्रवर्ती सोबतच तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती, सुशांतच्या स्टाफपैकी काही जण एनसीबीने चौकशीसाठी अटकेमध्ये ठेवले आहेत. सध्या रियाची रवानगी मुंबईमध्ये भायखळा कारागृहामध्ये करण्यात आली असून तिचा जामीन दोनदा नाकारण्यात आला आहे.

रियाला अटक झाल्यानंतर बॉलिवूडमध्ये काही सेलिब्रिटींनी रियाला न्याय  मिळाला पाहिजे, तिची सुटका करा अशी मोहीम देखील चालवली सोशल मीडीयामध्ये चालवली आहे. यामध्ये राधिका आपटे, विद्या बालन, अनुराग कश्यप, पुलकित सम्राट यांचा समावेश आहे.