Showik, Rhea Chakraborty (Photo Credits: File Image)

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput Case) प्रकरणी NCB ने त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty), तिचा भाऊ शौविक (Showik)आणि ड्रग्ज प्रकरणाशी संबंधित अन्य 5 आरोपींना अटक केली होती. दरम्यान रियाला 8 सप्टेंबरला अटक करुन 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यामुळे रियाने मुंबई विशेष कोर्टात जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र आज मुंबई विशेष कोर्टाने (Mumbai Special Court) ही जामीन याचिका फेटाळली आहे. तसेच यात प्रकरणाशी संबंध असलेल्या ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अब्दुल बसीत (Abdul Basit), झाहिद विलात्रा (Zaid Vilatra), दिपेश सावंत (Deepesh Sawant) आणि सॅम्युअल मिरांडा (Samuel Miranda) यांचा जामीन अर्ज कोर्टाकडून फेटाळण्यात आला आहे.

मुंबई विशेष कोर्टाने दिलेल्या या निर्णयामुळे रिया चक्रवर्तीची 22 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी कायम राहणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. Rhea Chakraborty हिच्या अटकेनंतर सुशांत सिंह राजपूत ची बहिण श्वेता सिंह किर्ति ने सोशल मिडियावर दिली 'ही' प्रतिक्रिया

रियाविरोधात एनडीपीएस कायद्याच्या कलम 8 सी आणि 28 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कलमांखाली शिक्षा 6 महिने ते 10 वर्षांपर्यंत असू शकते. या कायद्याच्या कलम 29 चा संदर्भही आहे, जो गुन्हेगारी कारस्थान मानला जातो. रिया चक्रवर्तीच्या अटकेबाबत बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे म्हणाले की, ड्रग पेडलरसोबत तिचे संबंध होते, म्हणूनच तिला अटक केली गेली आहे. एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आजच्या चौकशीत सुशांत सिंह राजपूत केसमधील ड्रग प्रकरणामध्ये रियाचा संबंध असल्याचे निष्पन्न झाले होते.

रियाच्या अटकेनंतर माध्यमांना उद्देशून एनसीबीचे उपसंचालक केपीएस मल्होत्रा ​​म्हणाले की, रियाच्या कुटुंबीयांना अटकेची माहिती देण्यात आली आहे. रियाला तिच्या व्हॉट्सअॅप चॅटवरून मिळालेली माहिती आणि यापूर्वी अटक करण्यात आलेल्या लोकांच्या विधानांच्या आधारे अटक करण्यात आली आहे. रिया विरुद्ध एनसीबीकडे भक्कम पुरावे आहेत. त्यानंतर आता रियाचा जामीन अर्ज फेटाळल्यामुळे तिला 14 दिवसांची, म्हणजेच 22 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.