Blueprint of proposed mosque and super-speciality hospital in Ayodhya | (Photo Credits: Twitter)

अयोध्या (Ayodhya) येथील मशिदीच्या पहिल्या टप्प्यातील डिझाईनचे आज अनावरण करण्यात आले. पाच एकरात उभारण्यात येणाऱ्या मशिदीची ब्यूप्रिंट (Mosque Blueprint) उत्तर प्रदेश सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाकडून (Uttar Pradesh Sunni Central Waqf Board) ठरवण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) नेमून दिलेल्या पाच एकर जागेवरती या मशिदीचे बांधकाम होणार आहे. या ब्यूप्रिंटमध्ये मशिदीसोबत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल (Super Speciality Hospital) सुद्धा दाखवले आहे. राम जन्मभूमी प्रकरणावर कोर्टाने निर्णय दिल्यानंतर मुस्लिम पार्टीला मागील वर्षी ही जागा देण्यात आली होती आणि उरलेल्या जमिनीवरील बाबरी मशिद तोडून ती जागा हिंदूंना देण्यात आली. (श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने शेअर केले राम मंदिराच्या प्रस्तावित मॉडलचे खास फोटोज!, See Pics)

प्रदीर्घ चर्चेनंतर मशिदीसाठी दिलेली वेगळी जागा मुस्लिम पार्टीने स्वीकार केली. ही जागा स्वीकारण्यामध्ये काही लोकांनी सुरुवातीला अडथळा आणला होता. परंतु, नंतर ही जागा स्वीकारुन त्यावर मशिदीसोबत हॉस्पिटल उभारण्याचा देखील निर्णय झाला आहे. अयोध्येमधील धनीपूर गावात दिलेल्या जागेमध्ये एक इंडो इस्लामिक सेंटर, एक म्युझियम आणि एक कम्युनिटी किचन सुद्धा असेल. (Ayodhya Mosque: अयोध्या मशिद शिलान्यास कार्यक्रमाला मला कोणी बोलवणार नाही, मी जाणार नाही- योगी आदित्यनाथ)

पहा व्हिडिओ:

26 जानेवारी 2021 रोजी मशिदीचा शिलान्यास सोहळा पार पडेल असे इंडो इस्लामिक कल्चरल फाऊंडेशनचे ट्रस्ट इनचार्ज यांनी सांगितले. या सोहळ्यामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्याची शक्यता आहे.