युपी सुन्नी सेंट्रल बोर्डाकडून अयोध्या प्रकरणी देण्यात आलेल्या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे. राम जन्मभूमी-बाबरी मस्जिद वादप्रकरणी पक्षकार राहिलेल्या सुन्नी वफ्फ बोर्डाने असे म्हटले आहे की, आम्ही या निर्णयाच्या विरोधात पुनर्विचार याचिका दाखल करणार नाही. बोर्डाचे अध्यक्ष जुफर फारूकी यांनी सुद्धा न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले असून त्याला कोणतेही आव्हान देण्याचा विचार नसल्याची भुमिका स्पष्ट केली आहे.
फारूकी यांनी असे म्हटले की, 5 एकर जमीनीबाबत बोर्ड सदस्यांसोबत बातचीत करुन निर्णय घेणार आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की, आम्हाला सुप्रीम कोर्टाने अयोध्या प्रकरणी दिलेला निर्णय पूर्णपणे मान्य आहे. निर्णयापूर्वी सुद्धा आम्ही न्यायालयाच्या निर्णय मान्य असल्याचे म्हटले होते. मात्र आता पुन्हा कोणी या निर्णयावर पुनर्विचार करा असे म्हणत असल्यास ते चुकीचे आहे.(Ayodhya Verdict: अयोध्या प्रकरणी ऐतिहासिक सुनावणी करणाऱ्या 'या' 5 न्यायाधिशांबाबत जाणून घ्या)
त्याचसोबत शिया धर्मगुरु मौलाना कल्बे जवाद यांनी सुद्धा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. आम्ही विनम्रतेने निर्णयाचा स्विकार केला असल्याचे ही जवाद यांनी म्हटले आहे. मात्र पुनर्विचार याचिका दाखल करण्याच्या गोष्टीवर मी सहमत नसल्याचे ही जवाद यांनी सांगितले आहे. तर अयोध्या प्रकरणी निकालानंतर सुन्नी वफ्फ बोर्डाला 5 एकर जमीन देण्यात येणार आहे. केंद्राने असा आदेश दिला आहे की, मंदिर स्थापनेसाठी 3 महिन्यात ट्र्स्ट बनवणार आहे. या ट्रस्टचे प्रतिनिधीत्व निर्मोही आखाड्याकडून करण्यात येणार आहे.