कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या वर्किंग कमिटीची (Congress CWC) एक खास बैठक आज दिल्ली मध्ये पार पडली, यावेळी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह (Manmohan Singh), कॉग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi), यांच्यासहित कमिटी मधील सर्व नेते उपस्थित होते. यावेळी कोरोनाच्या लढ्यातील केंद्र सरकारच्या भूमिकेवर हल्लाबोल करताना सोनिया गांधी यांनी भाष्य केले. या संकटाकाळात जेव्हा सर्व पक्षांनी एकत्र येऊन कोरोनाला लढा द्यायला हवा तिथे भाजप (BJP) नकारात्मकता आणि जातीय पक्षवादाचा व्हायरस पसरवत आहे अशा शब्दात सोनिया यांनी भाजप सरकारवर टीका केली. कोरोनाच्या लढ्यासाठी चाचणी, तपास आणि रुग्णांना क्वारंटाईन करण्याला काहीही पर्यय नाही आम्ही याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना अनेकदा सुचना केल्या आहेत मात्र तरीही दुर्दैवाने अजूनही कोरोनाच्या चाचण्या कमी होत आहेत असेही सोनिया यांनी म्हंटले आहे. Coronavirus In India: भारतात कोरोना व्हायरसचा धोका वाढला; कोरोना बाधितांची आकडा 21000 च्या पार
कोरोनाव्हायरसच्या संकटाला रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या परिणामावर सोनिया गांधी यांनी भाष्य करताना म्हंटले की "लॉकडाउन मुळे 12 कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत आणि सध्या भारतात आर्थिक कामे बंद असल्याने हेबेरोजगारी आणखीन वाढण्याची सुद्धा शक्यता आहे."
ANI ट्विट
BJP is spreading the virus of hatred and communal bias at the time when everyone together should fight coronavirus: Congress Interim President Sonia Gandhi during CWC meeting in Delhi (file pic) pic.twitter.com/TrE0QMCxbG
— ANI (@ANI) April 23, 2020
दरम्यान, सोनिया गांधी यांनी आपल्या भाषणातून देशातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येबद्दल चिंता व्यक्त केली. तसेच डॉक्टर, नर्स, पॅरामेडिक्स, आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कामगार आणि आवश्यक सेवा पुरवठा करणारे, स्वयंसेवी संस्था यांंनी गरजुंना व लाखो नागरिकांना दिलासा दिला आहे, त्यांचे समर्पण व दृढनिश्चय आपल्या सर्वांना खरोखर प्रेरणा देते त्यांचे कौतुक केले पाहिजे. पुरेशी वैयक्तिक संरक्षण उपकरणे नसतानाही ही मंडळी कोरोनाला लढा देत आहेत असेही सोनिया यांनी म्हंटले आहे.