प्रतीकात्मक फोटो | (Photo Credits: File Image)

कोरोना व्हायरसचा विळखा भारतात अधिकाधिक वाढत चालला आहे. दिवसागणित कोरोनाग्रस्तांची संख्येत पडणारी भर धोका वाढवत आहे. भारतात एकूण 21393 कोरोना बाधित रुग्ण असून त्यापैकी 4257 जणांची प्रकृती उपचारानंतर सुधारली आहे. त्यामुळे 16454 कोरोनाग्रस्तांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत 681 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. कोरोना व्हायरसचा वाढता धोका टाळण्यासाठी सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र तरी देखील कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंता उत्पन्न करत आहे.

महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, राजस्थान या राज्यात कोरोनाचे संकट अधिक तीव्र होताना दिसत आहे. या राज्यांत दिवसागणित रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रात एकूण 5652 कोरोना बाधित रुग्ण आहेत. तर गुजरातमध्ये 2407 कोरोनाग्रस्त आहेत. दिल्लीमध्ये कोविड 19 पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 2248 असून राजस्थानमध्ये हा आकडा 1890 इतका आहे. (महाराष्ट्रातील COVID-19 संक्रमित रुग्णांची जिल्हानिहाय आकडेवारी; आजचे ताजे अपडेट एका क्लिकवर)

ANI Tweet:

कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनचा कालावधी 3 मे पर्यंत वाढवण्यात आला असून 27 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. या बैठकीत सर्व राज्यातील कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेण्यात येईल. त्याचबरोबर देशव्यापी लॉकडाऊनबाबत पुढील धोरण ठरवण्यात येईल.