Coronavirus in Maharashtra | (Photo credit: archived, edited, symbolic images)

राज्यातील कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. शेवटचे अपडेट हाती आले तेव्हा महाराष्ट्रातील कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या 5649 इतकी झाली होती. यात नव्याने आढळलेल्या 431 रुग्णांसह आतापर्यंत मृत्यू झालेल्या 269 रुग्णांचाही समावेश आहे. राज्यातील 5649 कोरोना रुग्णांपैकी आतापर्यंत उपचार घेऊन बरे झालेल्या आणि रुग्णालयातून सुट्टी मिळालेल्या रुग्णांची संख्या 789 इतकी आहे. राज्यातील जिल्हानिहाय रुग्णांची संख्याही कमीअधिक प्रमाणात वाढत आहे. अपवाद केवळ मुंबई आणि पुणे येथील या दोन जिल्ह्यात मात्र कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसते आहे. जाणून घ्या महाराष्ट्रातील कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची जिल्हानिहाय आकडेवारी.

महाराष्ट्रातील जिल्हानिहाय कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची इथे दिलेली आकडेवारी ही 22 एप्रिल 2020 या दिवशी सायंकाळी 6 वाजता अद्ययावत करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे आरोग्य मंत्रालय प्रत्येक दिवसाची कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची जिल्हानिहाय आकडेवारी आणि तपशील हा त्या त्या दिवशी सायंकाळी 6 किंवा त्याच दिवशी रात्री उशीरा अद्यावत करत असते. त्यानुसार प्राप्त झालेली अधिकृत आकडेवारी खालील तक्त्यात दिली आहे. (हेही वाचा, Maharashtra Police: महाराष्ट्रामधील 12 अधिकाऱ्यांसह 52 पोलिस हवालदारांना कोरोना विषाणूची लागण; सर्वात जास्त पोलीस मुंबईमधील)

कोविड-19 महाराष्ट्र राज्याची जिल्हा/मनपा निहाय सध्या स्थिती

(*अद्ययावत आकडेवारी दि. 22 एप्रिल 2020, सायं 6.00 नुसार)

अ.क्र. जिल्हा/मनपा बाधित रुग्ण मृत्यू
1 मुंबई मनपा 3683 161
2 ठाणे 24 2
3 ठाणे मनपा 166 4
4 नवी मुंबई मनपा 101 3
5 कल्याण डोंबिवली मनपा 97 3
6 उल्हासनगर मनपा 1 0
7 भिवंडी निजामपूर मनपा 7 0
8 मीरा भाईंदर 81 2
9 पालघर 19 1
10 वसई विरार मनपा 115 3
11 रायगड 16 0
12 पनवेल मनपा 35 1
  ठाणे मंडळ एकूण 4345 180
1 नाशिक 4 0
2 नाशिक मनपा 7 0
3 मालेगाव मनपा 94 9
4 अहमदनगर 21 2
5 अहमदनगर मनपा 8 0
6 धुळे 5 1
7 धुळे मनपा 4 0
8 जळगाव 4 1
9 जळगाव मनपा 2 1
10 नंदुरबार 7 0
  नाशिक मंडळ एकूण 156 14
1 पुणे 19 1
2 पुणे मनपा 734 54
3 पिंप्री-चिंचवड मनपा 52 2
4 सोलापूर 0 0
5 सोलापूर मनपा 30 3
6 सातारा 16 2
  पुणे मंडळ एकुण 851 62
1 कोल्हापूर 6 0
2 कोल्हापूर मनपा 3 0
3 सांगली 26 0
4 सांगली मिरज कुपवाड मनपा 1 1
5 सिंधुदुर्ग 1 0
6 रत्नागिरी 8 1
  कोल्हापूर मंडळ एकुण 45 2
1 औरंगाबाद 1 0
2 औरंगाबाद मनपा 37 5
3 जालना 2 0
4 हिंगोली 7 0
5 परभणी 0 0
6 परभणी मनपा 1 0
  औरंगाबाद मंडळ एकूण 48 5
1 लातूर 8 0
2 लातूर मनपा 0 0
3 उस्मानाबाद 3 0
5 बीड 1 0
6 नांदेड 0 0
7 नांदेड मनपा 1 0
  लातूर मंडळ एकूण 13 0
1 अकोला 11 1
2 अकोला मनपा 10 0
3 अमरावती 0 0
4 अमवरावती मनपा 7 1
5 यवतमाळ 18 0
6 बुलढाणा 24 1
7 वाशीम 1 0
  अकोला मंडळ एकूण 71 3
1 नागपूर 3 0
2 नागपूर मनपा 97 1
3 वर्धा 0 0
4 भंडारा 0 0
5 गोंदिया 1 0
6 चंद्रपूर 0 0
7 चंद्रपूर मनपा 2 0
8 गडचिरोली 0 0
  नागपूर मंडळ एकूण 103 1
1 इतर राज्य 17 2
  एकूण 5649 269

दरम्यान, महाराष्ट्रासह देशभरातील कोरोना व्हायरस रुग्णांच्या आकडेवारीचा विचार करता ती आकडेवारीही वाढताना दिसते आहे. भारतात कोरोनाचे आतापर्यंत 15859 रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील 652 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 3960 जणांची प्रकृती उपचारानंतर सुधारल्याने त्यांना रुग्णालयांतून सुट्टी देण्यात आली आहे. देशात सद्यास्थितीत रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 20471 इतकी आहे.